India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येवला शहरातील शिवसेना शाखा स्थापनेला चाळीस वर्ष पूर्ण; छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

येवल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह जुन्या शिवसैनिकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते ५ मार्च १९८३ साली येवला शहरात पहिली शिवसेनेची शाखा सुरू केली होती. या स्थापनेला आज चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येवला शहरातील शिवसेनेचे नेते किशोर सोनवणे यांच्यासह जुन्या शिवसैनिकांनी येवला संपर्क कार्यालयात छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत छगन भुजबळ यांनी शिवसैनिकांना जय महाराष्ट्र केला.

येवल्यातील जुने शिवसैनिक किशोर सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जुन्या छायाचित्रांचा अल्बम छगन भुजबळ यांना दाखविला. यावेळी जुने फोटो बघताच छगन भुजबळ यांनी येवल्यातील सभा स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.दादा कोंडके इतर नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांसमवेत जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये छगन भुजबळ व कार्यकर्ते रममान झाल्याचे बघावयास मिळाले. येवल्यातील शिवसेना शाखा स्थापनेबाबत जुन्या कार्यकर्त्यांची छगन भुजबळ यांनी आस्थेने चौकशी केली. यावेळी शिवसैनिक किशोर सोनवणे, बाजीराव भोर, चंद्रमोहन मोरे, गणेश सोनवणे, अर्जुन मोडसे, भागीनाथ थोरात यांनी भेट घेत छगन भुजबळ यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देत सन्मान केला.

Yeola Shivsena Branch 40 Years Chhagan Bhujbal Memories


Previous Post

स्वस्तात आयफोन खरेदीचे आमिष…. तब्बल २९ लाख गमावले… असं घडलं सगळं… तुम्हीही खबरदारी घ्या…

Next Post

होळीनिमित्त या गावात आहे अनोखी परंपरा… हास्य विनोदासह सामुहिकपणे केली जाते चक्क शिवीगाळ…

Next Post

होळीनिमित्त या गावात आहे अनोखी परंपरा... हास्य विनोदासह सामुहिकपणे केली जाते चक्क शिवीगाळ...

ताज्या बातम्या

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group