सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात नेमलेल्या कंत्राटी कामगारांचे थकीत पगारासाठी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन सुरू आहे. नाशिक येथील महाराष्ट्र विकास ग्रुप या खासगी कंपनी तर्फे उपजिल्हा रुग्णालयात ४८ कर्मचाऱ्यांची भरती २०२१ मध्ये करण्यात आली होती. मात्र मात्र गेल्या तीन महिन्यापासून वेतन या कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यातच त्यांचा नियुक्तीचा कार्यकाळ संपलेला असून तोंडी आश्वासनावर त्यांच्याकडून काम करून घेण्यात येत असल्याने या सर्व ४८ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयाच्या कामावर,सेवांवर परिणाम होणार आहे.