अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला येथील जनकल्याण सेवा समितीच्या वतीने कष्टकरी महिलां समवेत सामुहिक रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. गेल्या २० वर्षापासून अशा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यावेळी तालुक्यातील दहेगावधूळ येथे जाऊन येथील कष्टकरी महिलांच्या हस्ते राखी बांधून घेत त्यांना साडीचोळी भेट देत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. दरवर्षी विविध ठिकाणी जाऊन ही समिती अशा अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा करत असते.