येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील दाटलोक वस्ती असलेल्या वल्लभनगर या ठिकाणी हॉटेल व्यवसायिक असलेले सोनू पवार यांच्या मालकीची टाटा सुमो गाडी घराजवळ लावलेली असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्केटून अचानक गाडीने पेट घेतला. ही बाब पवारांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना जागे करत पाण्याच्या मोटर लावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडी पूर्ण जळून भस्मसात झाली होती. अचानक झालेल्या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.