येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्यरात्रीच्या सुमारास येवले शहरातील कृष्णा फरसाण या दुकानात झालेली चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. चोरट्यांनी रोख रक्कम व दुकानातील इतर सामान असा वीस ते पंचवीस हजाराचा एेवज चोरुन नेला. या चोरीबाबत दुकानाचे संचालक मारुती पवार यांनी येवला शहर पोलिसात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. हे दुकान भरवस्तीत असून सुध्दा चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांची शहरात गस्त वाढवण्याची मागणी या चोरीनंतर व्यापा-यांनी केली आहे.