येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड-येवला राज्य महामार्गावर आयशर ट्रक व कंटेनर यांचा येवल्याजवळ समोरा-समोर भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. आयशर ट्रक चालक ट्रक मध्ये दबल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातानंतर दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्या आहेत.