रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बिनधास्त करा मुक्त विद्यापीठाचे एमबीए; मिळाली ही मान्यता

by India Darpan
जून 23, 2023 | 12:53 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
YCMOU1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एम.बी.ए. शिक्षणक्रमाला ऑल इंडिया कौन्सील फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ची मान्यता मिळाली आहे. याबाबतची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केली. यावेळी कुलसचिव भटूप्रसाद पाटील आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे उपस्थित होते.

दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या या मान्यतेमुळे मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला अधिक महत्व प्राप्त होऊन याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या एमबीएला प्रवेश घेता येणार आहे. ही मान्यता असून आगामी पाच वर्षांसाठी आहे. या मान्यतेमुळे मुक्त विद्यापीठातून एमबीए पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात एआयसीटीईच्या मान्यतेमुळे नोकरी व्यवसायात अधिक महत्व प्राप्त होणार आहे. या शिक्षणक्रमासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याकरता प्रवेश पात्रता परीक्षाही लवकरच घोषित केली जाणार आहे. विविध विषयांसोबतच ऑन जॉब ट्रेनिंग, फिल्ड प्रोजेक्ट, ओपन इलेक्टिव्हज ही एमबीएची वैशिष्ट्ये असणार आहेत. मार्कटिंग, ह्युमन रिसोर्स आणि फायनान्स या तीन प्रमुख शाखा असणार आहेत.

व्यावसायिक दर्जा प्राप्त होईल – कुलगुरू प्रा. सोनवणे
एआयसीटीईच्या मान्यतेमुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला अधिक व्यापक प्रतिसाद मिळेल. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि त्या मार्फत चालवले जाणारे एमबीएसारखे महत्वाचे शिक्षणक्रम यांना नव्या युगातील व्यावसायिक विश्र्वात एक चांगला दर्जा प्राप्त होईल, यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केली.

सकारात्मक प्रयत्नांना यश – डॉ. पाटोळे
मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला एआयसीटीईची मान्यता मिळण्यासाठी कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू होते. संबंधित विद्याशाखा तथा विद्यापीठ प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला एआयसीटीईची मान्यता मिळू शकली आहे, अशी प्रतिक्रिया वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे यांनी व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अख्ख मंत्रिमंडळच पंढरपुरात… तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे असे आहे भरगच्च नियोजन…

Next Post

ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीचे समन्स

Next Post
FzP5hjuXgAMGiVr e1687505751140

ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीचे समन्स

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011