India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म, नाव ठेवले नाशिक; सेवाग्राम एक्सप्रेसमधील प्रकाराची सर्वत्र चर्चा

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धावत्या रेल्वेत प्रसुतीकळा सुरू होऊन डिलिव्हरी झाल्याच्या घटना बरेचदा ऐकण्यात, वाचण्यात येत असतात. असाच एक प्रकार सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये नाशिक रेल्वेस्टेशनदरम्यान घडला. मुख्य म्हणजे ही घटना नाशिकजवळ घडल्यामुळे संबंधित महिलेने स्वत:च्या मुलाचे नाव नाशिक ठेवल्याची सर्वत्र चर्चा आहे.

मुंबईहून नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस निघाली. नाशिक स्टेशन जवळ येऊ लागले असता यातील एका एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिच्यासोबत असलेल्या इतर महिलांनी संपूर्ण परिस्थिती हाताळत डिलीव्हरी पार पाडली. एका गुटगुटीत बाळाचा जन्म झाला. त्यामुळे नाव काय ठेवणार, हा प्रश्न विचारला असता त्या महिलेने क्षणाचाही विलंब न करता ‘नाशिक’ असे नाव ठेवल्याचे जाहीर करून टाकले. तिच्या या उत्तराची चर्चा संपूर्ण रेल्वेत झपाट्याने पसरली. ती ऐकून अनेकांनी तिची भेट घेतली, बाळाला आशीर्वाद दिलेत. तर काहींनी जमेल ती आर्थिक मदतदेखील देऊ केली. धावत्या रेल्वेतील बाळाच्या जन्माच्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बाळाला जन्म दिलेली महिला आणि तिच्यासोबत असलेल्या सहकारी महिला या मुंबईत कॅटरिंगचे काम करतात. त्या मुंबईहून यवतमाळकडे निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान प्रसुतीची घटना घडली.

Women Delivery in Railway Child Name Nashik


Previous Post

शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी तुमच्या काही सूचना आहेत? तातडीने येथे पाठवा

Next Post

मालिकेच्या सेटवरच टीव्ही अभिनेत्री झाली बेशुद्ध

Next Post

मालिकेच्या सेटवरच टीव्ही अभिनेत्री झाली बेशुद्ध

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group