पुणे – आपल्या ग्राहकांसाठी ईपीएफओने मोठी सुविधा निर्माण केली आहे. या अंतर्गत कोणताही सदस्य गरज पडल्यास कोणतीही कागदपत्रे सादर न करता त्याच्या पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढू शकतो. ही सुविधा पगारदारांना मेडिकल अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत देत आहे. ईपीएफओने कार्यालयाने एक निवेदन देऊन ही माहिती दिली आहे.
ईपीएफओने म्हटले आहे की, जीवघेणा आजार झाल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने 1 लाख रुपयांची गरज भासल्यास पीएफ खातेदार या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तसेचअर्ज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील. मेडिकल अॅडव्हान्स क्लेम करणार्या कर्मचार्याच्या रुग्णाला सरकारी – सार्वजनिक क्षेत्र युनिट- सीजीएचएस पॅनेल केलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे. तातडीच्या स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असेल, तर यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्यानंतरच तुम्ही वैद्यकीय दाव्यासाठी अर्ज भरू शकता.
या सुविधेअंतर्गत, फक्त 1 लाख रुपयांपर्यंत अॅडव्हान्स काढू शकता. जर कामाच्या दिवशी अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील. हे पैसे कर्मचार्यांच्या खात्यात किंवा थेट हॉस्पिटलमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागते. तुमचे अंतिम बिल आगाऊ रकमेमध्ये जमा करू द्या. आता आपण पैसे कसे काढू शकता ते समजून घेऊ या…
> तुम्ही www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आगाऊ दावा ऑनलाइन करू शकता.
> आगाऊ दावा unifiedportalmem.epfindia.gov.in वरून देखील केला जाऊ शकतो.
> येथे तुम्हाला Online Services वर क्लिक करावे लागेल.
> आता तुम्हाला दावा (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.
> यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक टाकून पडताळणी करावी लागेल.
> आता तुम्हाला Proceed for Online Claim वर क्लिक करावे लागेल.
> ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31) निवडावा लागेल.
> यानंतर तुम्हाला पैसे काढण्याचे कारणही द्यावे लागेल.
> आता तुम्हाला रक्कम टाकावी लागेल आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
> यानंतर तुमचा पत्ता तपशील भरा.
> Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
> आता तुमचा दावा दाखल केला जाईल.