नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वन्य प्राणांच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर इगतपुरी वनविभागने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे विभागाच्या पथकाला या टोळीवर सिनेस्टाईल पाठलाग करावा लागला. यादरम्यान हवेत गोळीबारही झाला. अखेर चार जणांना गजाआड करण्यात वनविभागाला यश आले आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तस्करांना पकडण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील आंबोली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. बनावट ग्राहक म्हणून ते बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांकडे गेले. त्यानंतर या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही कारवाई करतांना हवेत गोळीबारही करण्यात आला. या तस्कराच्या रॅकेटमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय तस्कर असल्याची माहिती समोर आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरासेस आणि वन विभागचे कर्मचारी हे या टोळीच्या गेल्या १ महिन्यांपासून मागावर होते.
वनविभागाच्या पथकाला तस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग करावा लागला. याचदरम्यान हवेत गोळीबारही करण्यात आला. पण वनविभागाने न डगमगता या रॅकेटचा पर्दाफाश करुन चार जणांना ताब्यात घेतले. आता वनविभाग या चारी जणांची कसून चौकशी करत आहे. यात आंतरराष्ट्रीय तस्काराचा सुध्दा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चौकशीनंतर अनेक गोष्टी उघड होईल. इगतपुरी तालुक्यातून अनेक वन्य जीवांची हत्या करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले. पण, आता तस्करच हातात लागल्यामुळे अनेक धागेदोरे समोर येणार असल्याचे वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
Wildlife Skin Smuggling Racket Busted Igatpuri Nashik Forest Department 4 Arrested Crime