India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिककरांना मिळणार रानभाज्यांचा लाभ; या ठिकाणी, या दिवशी भरणार रानभाज्या महोत्सव

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत पंचायत समितीच्या आवारात यावर्षीही रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक आठवड्यात रानभाज्या विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

उमेद (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत नाशिक जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरण व जीवनोन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरिबातील गरीब महिलांचे संघटन करून त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण कशा होतील व त्यांची कायमस्वरूपी उपजीविकेत वृद्धी कशी निर्माण होईल, यावर महाराष्टात राज्यात व नाशिक जिल्ह्यात कार्य सुरू आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रानभाज्या महोत्सव राबविला जातो.

आदिवासी भागातील गरीब महिलां पावसाळ्यात रानात जाऊन रानभाज्या गोळा करतात. या राभाज्यांचे आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषवर्धक असे अनेक फायदे आहेत. पावसाळा सुरवात झाली की रानात, माळावर रानभाज्या उगवायला सुरवात होते, आदिवासी महिला भर पावसात जाऊन या रानभाज्या गोळा करतात. या रानभाज्या खायला अतिशय पौष्टिक, आरोग्य वर्धक व बहुगुणी आहेत. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, सापोजेनिन, सॅपोनिन, सोडियन सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम असते. या रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उददेशाने उमेद – अभियानामार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

नाशिक पंचायत समिती आवारात तीन महिने या रानभाज्या महोत्सव राबविण्यात येणार असून दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत पावसाळयातील रानभाज्या विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी दिली. रानभाज्या महोत्सवानंतरही महिला स्वय्ंसहयता गटांना दिवाळीपर्यत येणा-या विविध सणांसाठीच्या वस्तु विक्री करण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

दरम्यान, रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन बुधवार २७ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हाधिकारी गंगाधरण डी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे,गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी -विनोद मेढे,जिल्हा अभियान व्यवस्थापक – बंडू कासारआदि उपस्थित राहणार आहेत. नाशिक शहर परिसरातील नागरिकांनी या रानभाज्या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजनाकंडून करण्यात आले आहे.


Previous Post

चुकून दुसऱ्याची गाडी नेली; पण, व्हॅाटसअ‍ॅपमुळे काय घडले ते आले समोर

Next Post

राज्यातील या ९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १३ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

Next Post

राज्यातील या ९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १३ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group