पुणे – व्हॉट्सअॅप हा दीर्घकाळापासून वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मेसेज, कॉल, इमेज इत्यादीच्या माध्यमातून आप्तेष्ट, नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी सगळेच जण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. युजर्सना व्हॉट्सअॅपकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात. परंतु त्यातील काही फिचर्स असेसुद्धा आहेत, ज्यांचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जातो. काही युजर्स कोणाचा पाठलाग करण्यासाठी थर्ड पार्टी अॅपद्वारे लास्ट सीन स्टेटस आणि ऑनलाइन स्टेटस पाहतात.
काही युजर्सना असेही लक्षात आले असेल की ज्यांच्याशी अनेक दिवसांपासून चॅटिंग केली नाही, अशांचे ऑनलाइन स्टेटस किंवा लास्ट सीन स्टेटस ते पाहू शकत नाहीत. व्हॉट्सअॅप बिटा फिचर्सला ट्रॅक करणार्या WABetaInfo या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, इंस्टेंट मॅसेजिंग अॅप्लिकेशनने थर्ड पार्टी अॅप्लिकेशनला टाइम लॉगपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी नव्या फिचरचे संशोधन केले आहे.
अँड्राइडच्या गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप्पल अॅप स्टोअरवर काही असे थर्ड पार्टी अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून कोणाचेही ऑनलाइन स्टेटस टाइम आणि लास्ट सीन टाइम अशा व्हॉट्सअॅप डेटाला अॅक्सेस करू शकतात. व्हॉट्सअॅपने आता अशा अॅप्सना अशा डेटापर्यंत पोहोचण्यास रोखण्यासाठी काही सुरक्षा उपाय सादर केले आहेत.
दोन अकाउंटवर लास्ट सीन स्टेटस अॅक्टिव्ह असतानाही युजर्स त्याला चॅट हिस्ट्री नसेल तोपर्यंत पाहू शकत नाही. अशा परिस्थितीत ऑनलाइन स्टेटसही दिसू शकणार नाही. युजर्सशी नेहमी चॅट करणार्या मित्र, कुटुंबीय आणि व्यावसायिकांच्या चॅटमध्ये नवी मर्यादा कोणताही अडथळा निर्माण करणार नाहीत, असे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात व्हॉट्सअॅप म्हणाले, की आमच्या युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी ज्यांना तुम्ही ओळखत नाहीत आणि ज्यांच्याशी तुम्ही कधीही चॅटिंग करत नाहीत, अशा लोकांसाठी आम्ही व्हॉट्सअॅप कठीण बनवत आहोत. जेणेकरून तुमचे लास्ट सीन किंवा ऑनलाइन उपस्थिती पाहू शकणार नाहीत.
तुम्ही नेहमी ज्यांच्याशी चॅटिंग करत असाल आणि त्यांचे लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस पाहू शकत नसाल तर तुमच्या कॉन्टॅक्टने सर्वांशी आपले स्टेटस शेअर करणे बंद केले असेल किंवा काही विशेष युजर्सना तुमची माहिती पाहण्याची परवानगी दिली असेल.