धनुर्मास (धुंदुरमास)
दिनांक 16 डिसेंबर पासून 13 जानेवारी पर्यंत धनुर्मास (धुंधुरमास) अर्थात शून्य मास किंवा कोदंडा मास (महिना) कालावधी आहे. मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीपासून पौष शुद्ध एकादशीपर्यंत भोगी पर्यंत हा काळ असतो. या संपूर्ण महिनाभर सूर्य हा धनु राशीत असतो, तर मकर संक्रांतीला तो मकर राशीत प्रवेश करतो.

व्हॉटसअॅप – 9373913484
पौराणिक शास्त्र प्रमाणे हा संपूर्ण महिना सर्व प्रकारच्या फक्त धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ मानला आहे. त्यामुळे या संपूर्ण महिनाभर शुभ कार्य (लग्न, मुंज, साखरपुडा इ.) केली जात नाहीत. म्हणून या काळात कोणत्याही शुभ मुहूर्त दिलेले नसतात. हा काळ म्हणजे दक्षिणायनचा शेवट व उत्तरायण सुरुवात यातील मधला काळ होय.
दक्षिणायन म्हणजे देवतांची रात्र उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस तर धनुर्मास म्हणजे देवतांची पहाट होय, असा शास्त्रअर्थ आहे. या काळामध्ये वर्षभर राहून गेलेली धार्मिक कार्ये पार पाडली जातात. या संपूर्ण महिनाभर पहाटे प्रमाणेच दिवसभर वातावरण अल्हाददायक असते. धर्मशास्त्र व शरीर शास्त्र यांचा सुंदर मिलाफ म्हणजे धनुर्मास होय. भारतातील विविध राज्यांमध्ये धनुर्मास विविध नावांनी ओळखला जातो, तर अनेकविध पद्धतीच्या धार्मिक विधींनी साजरा केला जातो.