India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘त्या’ पैशांबाबत अर्पिता मुखर्जीचा ईडीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील शालेय नोकरी घोटाळ्यात अटक करण्यात आलेले राज्य सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी हिने मोठा खुलासा केला आहे. अर्पिता मुखर्जी सांगते की पार्थ चॅटर्जी तिच्या घराचा वापर ‘मिनी बँक’ म्हणून करत असे.

अर्पिताने सांगितले की, पार्थ चॅटर्जी तिच्या घरातच पैसे ठेवत असे. ईडीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्याचवेळी ईडीच्या या दाव्याला अर्पिता मुखर्जीच्या वकिलांकडून आव्हान दिले जाऊ शकते. वकिलांचे म्हणणे आहे की ईडीकडून तपासाचा तपशील प्रसारमाध्यमांमधून बाहेर येत आहे, जो चुकीचा आहे. यासोबतच केंद्रीय यंत्रणांकडून नोंदवल्या जाणाऱ्या खटल्यांमध्ये वकिलांना दोषी ठरविण्याच्या कमी दरावरही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.

पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या घोटाळ्यातील आरोपी कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण नुकतेच या प्रकरणाविषयी ईडीने कोलकाता हायकोर्टात महत्त्वाची माहिती समोर ठेवली आहे. या माहितीतून एका काळ्या डायरीचा मुद्दा समोर आला असून ही काळी डायरी पार्थ चॅटर्जी यांची नीकटवर्तीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून जप्त करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यामुळे खळबळ माजली आहे. सोमवारी या प्रकरणात आरोपी अर्पिताची चौकशी करण्यात आली. दर ४८ तासांनी चौकशी करण्यात येणार असून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत त्यांची चौकशी करु नये असे कोर्टाने सांगितले आहे. तसेच पार्थ चॅटर्जी यांना मंगळवारी कोलकात्यात आणण्यात आले असून आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे आणखी एक आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही ईडी चौकशी करणार आहेत.

अर्पिताला मुखर्जीला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्या आधी अर्पिताने पार्थ चॅटर्जी यांच्याशी असलेले संबंध आणि उत्पन्नाच्या साधनाबाबत कोणतीही माहिती ईडीला दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पार्थ आणि अर्पिता यांचा एकमेकांशी संबंध दाखवण्याचा प्रयचत्न ईडीकडून करण्यात येतो आहे, असे अर्पिता यांचे म्हणणे आहे.

या चौकशीत समोर आलेल्या ४० पानांच्या डायरीत शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी असल्याचे ईडीने म्हणले आहे. यातल्या ४० पैकी १६ पानांवर बेकायदेशीररित्या घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे. याबरोबरच उच्च शिक्षण विभागाचे एक पाकिटही अर्पिताच्या घरी सापडले असून त्यात ५ लाखांची कॅश असल्याचे ईडीने सांगितले आहे. दोन कंपन्यांत पैसे व्यवहाराचे पुरावेही मिळाले आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातूनच घोटाळ्याची रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. या सगळ्या काळात पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी हे एकमेकांशी संपर्कात होते असेही स्पष्ट होते आहे. अजूनही काही महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी मिळाली असून त्यात पार्थ यांची या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशीत आणखी महत्वाच्या बाबी समोर येईल असे ईडीकडून सांगितले जात आहे.

West Bengal Arpita Mukherjee ED Enquiry Clarification Partha Chatterjee


Previous Post

३ दिवस… १२ तास… १००हून अधिक प्रश्न… अखेर सोनिया गांधी यांची ईडी चौकशी पूर्ण

Next Post

३ वर्षात ३९ वेळा अर्ज नाकारला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही; अखेर ४०व्यांदा गुगलमध्ये झाला सिलेक्ट

Next Post

३ वर्षात ३९ वेळा अर्ज नाकारला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही; अखेर ४०व्यांदा गुगलमध्ये झाला सिलेक्ट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group