साप्ताहिक राशिभविष्य
– २५ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३
मीन – शत्रूंच्या कारवाया या सप्ताहात त्रासदायक ठरण्याची शक्यता. त्यामुळे यावर लक्ष ठेवावे लागेल. त्यांची कमकुवत स्थळे हेरून तेथील रसद बंद करावी लागेल……
कुंभ – महत्त्वाची बोलणी अथवा व्यवहार किरकोळ कारणांनी फिस्कटले जाऊ शकतात. चतुराईचा वापर करावा लागेल…….
मकर – महत्त्वाच्या कामात आधी केले मग सांगितले ही पद्धत वापरा. करत असलेल्या कामाचा डंका पिटू नये. असे केल्याने गैरसमज होऊन मोहीम तडीस जाणे अशक्य होईल……
धनु – आपल्या बाबतचे गैरसमज व त्यातून होणारे वाद या सप्ताहात डोकं वर काढण्याची शक्यता आहे. स्पष्ट व खोचक बोलून परिचितांना दुरावू नये……
वृश्चिक – प्रत्येक वेळी विविध कामांमध्ये घेत असलेला पुढाकार यामुळे कार्यगौरव होईल. पत प्रतिष्ठा वाढेल. ती जपण्यासाठी जबाबदारी वाढेल…….
तूळ – लहान सहान बाबींमधील ढवळाढवळ शक्यतो टाळावी. आपल्यापेक्षा अनुभवी व्यक्ती आपणास याबाबत समज देऊ शकते……
कन्या – वास्तविकतेचे भान ठेवणे. अति भावनिकता न दाखवणे. बोलताना विषयावर राहणे. त्याचप्रमाणे स्वतःचेच खरे न करणे. या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न या सप्ताहात करावे लागतील …….
सिंह – या सप्ताहात राजकीय व्यक्तींनी शब्द जपून द्यावे. जबाबदारीचे भान ठेवावे. राजकीय जीवनाला मोठी कलाटणी देणारी राजकीय घडामोड घडण्याची दाट शक्यता……
कर्क – घरातल्या लहानग्यांची तब्येत सांभाळणे. या सप्ताहात महत्त्वाचे आहे. भूतकालीन काही घटनांमुळे मानसिक अस्थिरता राहू शकते. मन कामात गुंतवून ठेवावे……
मिथुन – आपल्याबद्दल असूया असणारे ओळखून त्यांचा सल्ला किती मानायचा हे ठरवावे लागेल. मान, अपमान नाट्य या सप्ताहात आपल्यामुळे रंगणार नाही, याची काळजी घ्यावी…….
वृषभ – अति सहनशीलता दाखवणे देखील त्रासदायक ठरते. हे या स्वतः आपले लक्षात येईल. शुभवार्ता कळेल. घरात आनंदी वातावरण राहील……
मेष – सामाजिक कार्यात अग्रेसर रहाल. गुंतागुंतीचे व्यवहार टाळा. अनुभवी व्यक्तींची महत्त्वाची चर्चा होईल…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……
(सविस्तर मार्गदर्शनासाठी *भवानी ज्योतिषालय- पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84)