दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्न सोहळा हा नवरदेव आणि नवरीसह दोन्ही कुटुंबे आणि नातेवाईकांसाठी उत्साहाची मोठी पर्वणी असते. त्यामुळेच याच लग्नसमारंभात कालानुपरत्वे बदल होत आहेत. काही जण उत्साहाने विविध प्रकारची शक्कल लढवून या समारंभात नवे रंग भरतात. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. नवरदेवाची कार फुलांच्या माळांनी नाही तर चक्क कुरकुऱ्याच्या पाकीटांनी सजविण्यात आली. त्यामुळे ही बाब संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेची ठरली आहे. लग्नसराई सध्या जोरात सुरू असल्याने फुलांना मोठी मागणी आहे. परिणामी, फुलांचे दर कडाडले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील नवरदेवाच्या कारला फुलांची सजावट करणे शक्य होत नाहीय. त्यामुळे नवरदेवाकडून अनोखी शक्कल लढवण्यात आली. जानोरी येथे फुलांऐवजी चक्क कुरकूरे आणि वेफर्सच्या पाकीटांनी कार आकर्षकपणे सजविण्यात आली. त्यामुळे ही कार सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील वसंत सखाराम भसरे यांचे चिरंजीव आकाश व मातोरी ता. नाशिक येथील सुकदेव भडांगे यांची कन्या कविता यांचा विवाह मातोरी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. सध्या करोनाने सर्वसामान्य जनतेचे हाल केले असून खर्च करण्यासाठी पैसे नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. त्याच अवकाळी पाऊस, धुके, थंडी, वादळ, गारपीट आदी संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरीही हैराण झाले आहे. याचा एक भाग म्हणून फुलांना किमंती असल्याने सर्वसामान्य कुटूंबातील नवरदेवाला गाडी सजवण्यासाठी फुलांचा खर्च न परवडणारे आहे. त्यामुळे जानोरी येथील आकाश वसंत भसरे या नवरदेवाने नवीन शक्कल लढवून आपले वाहन सजविण्यासाठी चक्क कुरकुरे, वेफरची पाकीटांची माळ लावली. त्यामुळे सर्वांचे लक्ष या वाहनाने वेधुन घेतले होते. 20 फुलांचा बंडल 400 रुपयांना मिळतो. त्यामुळे पूर्ण गाडी सजविण्यासाठी सुमारे 9 ते 10 हजार रुपये लागतात आणि दुसर्या दिवशी हे फुले फेकून द्यावे लागतात. त्यामुळे पैसे वाया घालवण्याऐवजी कुरकुरे, वेफरची पाकीटांची माळांनी गाडी सजवली आहे. कुरकुरे, वेफर हे उपयोगात येणार आहे. त्यामुळे नवरदेवाने एक नवीन शक्कल लढवली आहे. या नवरदेवाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/308594057960992/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C
यासंदर्भात नवरदेवाचे वडील वसंत भामरे म्हणाले की, सध्या सर्वत्र बाजारपेठेमध्ये फुलांना मागणी आहे परंतू गेल्या काही दिवसांपासून या फुलांचे भाव वाढल्याने लग्नांमध्ये होणारा खर्च याशिवाय फुलांचा खर्च सर्व साधारण कुटूंबाना न परवडणारा आहे. त्यामुळे हौशेला मौल नाही. यानुसार आमच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली. त्या अनुषंगाने आम्ही फुलांऐवजी कुरकूरे, वेफर्सच्या पाकीटाने एक आगळा वेगळा संदेश नागरिकांमध्ये रुजला जावा, या उद्देशाने कुरकूरे, वेफर्सच्या पाकीटाने ही नवरदेवाची गाडी सजवण्यात आली आहे.