अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाच्या बुकिंग अधिकाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे रेल्वेने बाहेरगावी पाठविण्या आणलेल्या मालाची बुकिंग न करता सदर माल बेवारस दाखवून लिलाव करण्याचा घाट घातल्याचा आरोप संतप्त कारटिंग एजंटांनी केला आहे. या कृतीचा निषेध करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुध्दा केली आहे. रेल्वेच्या नियमानुसार दंड भरून लिलाव करण्यात येणारा माल परत मिळावा अशी मागणी करण्यात आली. महिलांच्या केसांचे ५२ बंडल कलकत्ता पाठविण्यासाठी बुक करण्यासाठी आणले होते. फलाटावर ठेवलेले ४५ बंडल बुकिंग न करता बेवारस दाखवून अकोला येथे पाठण्यात आले. ९० लाख रुपये किंमतीचा हा माल असून, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ४८ तासात माल व्यापाऱ्यास परत करावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा संतप्त व्यापारी व कारटिंग एजंट यांनी दिला आहे.