शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने कपिलधार येथे राज्यव्यापी वार्षिक मेळावा; या मान्यवरांची राहणार उपस्थिती

by India Darpan
ऑक्टोबर 26, 2022 | 1:06 pm
in इतर
0
IMG 20221026 WA0005

 

विठ्ठल ममताबादे, उरण 
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने कार्तिक शुद्ध पौर्णिमे निमित्त श्रीक्षेत्र कपीलधार (ता. जि. बीड) येथे भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी हा मेळाव्या घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सुमारे 4 ते 5 लाख कार्यकर्ते व भाविक उपस्थित राहतात.

शिवा संघटनेच्या मागणीनुसार श्रीक्षेत्र कपीलधार जिल्हा बीड येथे श्री क्षेत्र पंढरपुर प्रमाणेच सन 2002 पासुन शासनाच्या वतीने शासकीय महापूजा करण्यात येत आहे. दि. 19 नोव्हेंबर 2002 रोजी पहीली शासकीय महापूजा संपन झाल्यानंतर शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षी शासकिय महापूजा संपन्न होत आहे. यंदा 21 वी शासकीय महापूजा आणि शिवा संघटनेचा 27 वा राज्य वार्षिक मेळावा मोठया उत्साहात संपन्न होणार आहे.

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील लाखो लिंगायत भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे 16 व्या शतकातील वीरशैव संत श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजिवन समाधी मंदिर आहे.प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे सोमवार दि. 07 नोव्हे. 2022 रोजी दुपारी ठिक 4.00 वाजता 21 वे शासकीय महापूजा बीडचे पालकमंत्री ना. अतुल सावे, केंद्रीय राज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त अण्णा शिरसागर, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक शिवाचार्य यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे सर्व राष्ट्रीय, राज्य पदाधिकारी कार्यकर्ते, सांप्रदायिक मंडळी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी जय शिवाचा नारा देत आपल्या वाहनावर शिवा संघटनेचे झेंडे व बॅनर लावून मोठ्या जल्लोषात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे.

Virshaiv lingayat samaj Varshik Melava Kapildhar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो लावा’, अरविंद केजरीवालांचे पंतप्रधान मोदींना साकडे

Next Post

ऐन दिवाळीच्या सणातही एसटी कर्मचाऱ्यांची परवडच; महागाई भत्त्याचीही प्रतिक्षाच

Next Post
city bus e1631185038344

ऐन दिवाळीच्या सणातही एसटी कर्मचाऱ्यांची परवडच; महागाई भत्त्याचीही प्रतिक्षाच

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011