मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताची प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन विजय सेल्सच्या बहुप्रतीक्षित अॅपल डेज सेल्सला सुरुवात झाली आहे. १ जून २०२५ पर्यंत चालणाऱ्या या खास सेलमध्ये नवीनतम आयफोन्स, आयपॅड्स, मॅकबुक्स, अॅपल वॉच, एअर पॉड्स वगैरेंचा समावेश असलेल्या समस्त अॅपल उत्पादन श्रेणींमध्ये उल्लेखनीय डील्स मिळतील.
अॅपल डेज सेलचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे समस्त आयफोन लाइनअप वर मिळणारे भरघोस डिस्काउंट. सध्याची महत्त्वपूर्ण आयफोन १६ सिरीज पूर्वी कधी न मिळालेल्या किंमतीत उपलब्ध असेल. आणि त्यात आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ४००० रु. पर्यंतचे इन्स्टंट डिस्काउंट देखील असेल. आयफोन १६ (१२८ जीबी) ६६,९९०* रु. पासून सुरू होत आहेत. सामान्य किरकोळ किंमतीपेक्षा ही किंमत खूप कमी आहे. आयफोन १६ प्लस (१२८ जीबी) ७४,९९०* रु. पासून ऑफर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी स्क्रीन असलेला हा प्रकार सहजप्राप्य होईल. आयफोन १६ प्रो (१२८ जीबी) ची किंमत १०३,९९०* रु. पासून सुरू होत आहे. व्यावसायिक दर्जाची फोटोग्राफी क्षमता देणारा हा फोन येथे बऱ्याचशा परवडण्याजोग्या किंमतीत मिळत आहे. आयफोन १६ प्रो मॅक्स (२५६जीबी) १,२७,६५०* रु. पासून सुरू होत असून भरघोस बचतीसह सर्वोत्तम आयफोन अनुभव देणारा हा फोन आहे. परवडण्याजोग्या किंमतीत लक्षणीय क्षमता प्रदान करणारा आयफोन १६इ (१२८ जीबी) ४७,९९०* रु पासून उपलब्ध असेल.
आधीच्या जनरेशनच्या आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस या मॉडेल्सवर देखील आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील फ्लॅट ३००० रु. च्या इन्स्टंट डिस्काउंटसह आकर्षक ऑफर्स मिळतील. फ्लॅगशिप मॉडेलसाठी असामान्य मूल्य करणारा आयफोन१५ ५८,४९०* रु. पासून उपलब्ध असेल. आयफोन१५ प्लस ६६,९९०* रु. पासून सुरू होत असून तो मध्यम किंमतीच्या श्रेणीत मोठ्या डिस्प्लेचा अनुभव देतो. आयफोन १३ फक्त ४३,७९० रु. पासून मिळणार आहे. त्यामुळे अॅपल ईकोसिस्टममध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम एंट्री पॉइंट आहे.
आयफोन १६ सिरीज, आयफोन १६ प्रो सिरीज, आयफोन १६इ, आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसच्या खरेदीवर आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ४००० रु. पर्यंतचे इन्स्टंट डिस्काउंट आहे, ज्यामुळे त्यांचा मूल्य प्रस्ताव अधिक सुधारतो. ग्राहक विजय सेल्स ऑफलाइन स्टोअर्सवर पात्र स्मार्टफोन ही ट्रेडिंग करतेवेळी ७,५०० रु. पर्यंतच्या एक्स्चेंज बोनसचा लाभ देखील घेऊ शकतात.
आयपॅड आणि मॅक ऑफर्स:
विजय सेल्स अॅपल डेज प्रमोशनमध्ये अॅपलच्या कम्प्युटिंग लाइनअपवर व्यापक सूट देण्यात येत आहे. अष्टपैलू आयपॅड रेंजपासून त्याची सुरुवात होत आहे, ज्याची किंमत ३०,२००* रु. पासून सुरू होत आहे. आयपॅड ११वे जनरेशन ३०,२००* रु पासून उपलब्ध असेल. यात आकर्षक किंमतीत प्रीमियम फीचर्स आहेत. आयपॅड एअर ५२,४००* रु. पासून उपलब्ध असेल. यामध्ये एका अत्यंत पातळ उपकरणातून व्यावसायिक क्षमता प्रदान करण्यात आल्या आहेत. आयपॅड प्रो ची किंमत ८९,४००* रु. पासून सुरू होत असून टेबल कम्प्युटिंगचा परमोत्कर्ष गाठणारे हे उपकरण आहे. सर्व आयपॅडच्या खरेदीवर आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ३,००० रु. पर्यंतचे इन्स्टंट डिस्काउंट आहे, ज्यामुळे त्यांचा मूल्य प्रस्ताव अधिक सुधारला आहे.
मॅकबुक प्रो सिरीजच्या शोधात असलेल्या व्यावसायिक यूझर्सना त्या लाइनअपमध्ये आकर्षक ऑफर्स मिळतील. या किंमतीत आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ५००० रु. चे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे. एम४ चिप असलेल्या मॅकबुक प्रो ची प्रारंभिक किंमत १,४५,९०० रु. आहे. हे उपकरण सर्जनशील व्यावसायिकांना नवीनतम अॅपल सिलिकॉन प्रदान करते. एम४ प्रो चिप असलेल्या मॅकबुक प्रो ची प्रारंभिक किंमत १,७२,४००* रु. असून ते वर्कफ्लो जास्त असताना देखील उत्तम कामगिरी करते. एम४ मॅक्स चिप असलेल्या मॅकबुक प्रो ची प्रारंभिक किंमत २,७८,९००* रु. आहे. ते सर्वोत्तम पोर्टेबल कम्प्युटिंग ताकदचे प्रतिनिधित्व करणारे उपकरण आहे.
एम४ आणि एम२ चिप्स सह मॅकबुक एअर सिरीजच्या शोधात असेलल्या ग्राहकांसाठी विजय सेल्सने विशेष आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. एम४ आणि एम२ चिप असलेल्या मॅकबुक एअरची किंमत अनुक्रमे ७९,९०० रु. पासून आणि ६७,९९० रु. पासून सुरू होत आहे. या किंमतीत आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १०,००० रु. पर्यंतचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
अॅपल वॉच आणि ऑडिओ उत्पादने:
अॅपल डेज प्रमोशन तुम्हाला संपूर्ण अॅपल एकोसिस्टमच्या जवळ घेऊन जाते आणि वेअरेबल टेक्नॉलॉजीवर देखील भरपूर सूट देते. खाली दिलेल्या किंमतीत आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ३,००० रु. पर्यंतच्या इन्स्टंट डिस्काउंटचा समावेश आहे. अॅपल वॉच सिरीज१० ही ४०,६००* रु. पासून उपलब्ध असेल, ज्यामध्ये नवीनतम आरोग्य देखरेख आणि फिटनेस ट्रॅकिंग क्षमता आहेत. अॅपल वॉच एसइ (सेकंड जनरेशन) ची किंमत २०,९००* रु. पासून सुरू होत आहे. यात परवडण्याजोग्या किंमतीत आवश्यक अशी अॅपल वॉचची फीचर्स आहेत. अॅपल वॉच अल्ट्रा2 ची किंमत ७९,७००* रु. पासून ऑफर करण्यात येणार आहे. यामध्ये आउटडोर काम करणाऱ्यांसाठी व्यावसायिक दर्जाचा टिकाऊपणा आणि क्षमता आहेत.
अॅपलच्या ऑडिओ उपकरणांवर सवलत:
एअरपॉड्स४ १०,९००* रुपयांत उपलब्ध असेल. अॅपलच्या लोकप्रिय वायरलेस इयरबड्सच्या नवीनतम आवृत्तीसाठी तो एक अद्भुत सौदा ठरू शकतो. अॅक्टिव्ह नॉईझ कॅन्सलेशन वाला एअरपॉड्स४ हा १५,०००* रुपयांत उपलब्ध असेल, जो गुंतवून ठेवणारा श्राव्य अनुभव देतो. एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) २०,९००* रुपयांत ऑफर करण्यात येणार आहे. यामध्ये व्यावसायिक दर्जाच्या ऑडिओ क्षमता आणि सुधारित नॉईझ कॅन्सलेशन आहे. बीट्स ऑडिओ रेंज ५,५००* रु. पासून सुरू होत आहे. यामध्ये विविध स्टाइल आणि स्वरूपाचे घटक आहेत. या ऑडिओ उत्पादनांवर देखील २००० रु. पर्यंतची इन्स्टंट बँक डिस्काउंट आहेत. त्यामुळे संगीत प्रेमी आणि पॉडकास्टच्या चाहत्यांसाठी हा एक बेजोड मूल्य प्रस्ताव आहे.
शॉपिंगचा उत्कृष्ट अनुभव आणि अतिरिक्त लाभ:
अॅपलच्या टॉप उत्पादनांवर आकर्षक सवलतीसह विजय सेल्स अॅपल डेज ग्राहकांसाठी अतिरिक्त लाभ देखील घेऊन येत आहे. विजय सेल्सच्या सर्व दुकानांत १०,००० रु. पर्यंत एक्स्चेंज बोनस उपलब्ध आहे, त्यामुळे चांगल्या मूल्यासाठी ग्राहक पात्र उपकरणांचे फायदेशीर ट्रेडिंग करू शकतात. डेमो आणि ओपन बॉक्स वस्तूंवर विशेष किंमती. डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या उत्पादनांच्या खरेदीवर अतिरिक्त बचत करता येईल. प्रोटेक्ट+ वाढीव वॉरंटीवर २०% पर्यंत सूट आणि अपघाताने होणाऱ्या नुकसानासमोर संरक्षण प्लान नवीन खरेदी केल्यानंतर ग्राहकाला मानसिक शांती प्रदान करतात. चार्जर, केबल्स, अॅपल पेन्सिल, कीबोर्ड, केसेस आणि स्क्रीन प्रोटेक्टरसारख्या आवश्यक अॅपल ऍक्सेसरीज स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध आहेत.
डिस्प्ले आणि ओपन बॉक्स युनिट्सवर क्लियरन्स सेल:
अॅपल डेज सेल इव्हेंटचा एक भाग म्हणून विजय सेल्स विविध उत्पादन श्रेणींमध्ये डिस्प्ले आणि ओपन बॉक्स युनिट्सवर भरघोस सवलत देऊ करणार आहे. त्यामुळे आपल्या बजेटच्या मर्यादेत राहून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ही खास युनिट्स (उत्पादने) मर्यादित संख्येत उपलब्ध आहेत, त्यामुळे हजीर तो वजीर या धोरणाने पुरवठा असेपर्यंत या वस्तूंची विक्री करण्यात येईल.
मायव्हीएस लॉयल्टी प्रोग्रामचे फायदे:
अॅपल डेज प्रमोशन दरम्यान केलेल्या खरेदीवर ग्राहक खरेदी मूल्याच्या ०.७५% इतके मायव्हीएस लॉयल्टी पॉइंट कमावतील. प्रत्येक पॉइंटचे मूल्य १ रु. इतके आहे. हे पॉइंट भविष्यात कोणत्याही विजय सेल्सच्या दुकानातून खरेदी करताना वापरता येऊ शकतील. अशाप्रकारे अॅपल डेज दरम्यान केलेल्या व्यवहारांचे मूल्य दीर्घकालीन आहे.
ग्राहक देशभरातील १५०+ विजय सेल्सच्या दुकानातून किंवा त्यांच्या www.vijaysales.com या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुण अॅपल डेज सेलचा फायदा घेऊ शकतात आणि आकर्षक किंमतीत आपले अॅपल उपकरण अपग्रेड करण्याच्या संधीचे सोने करू शकतात.