India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – विचार पुष्प – प्रामाणिकपणाची ही अगदी प्राथमिक श्रेणी असते

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in व्यासपीठ
0

इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
प्रामाणिकपणाची ही अगदी प्राथमिक श्रेणी असते

प्रामाणिकपणा म्हणजे खरोखर नक्की काय… प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. बोलायचे एक आणि विचार मात्र वेगळाच करायचा, दावा करायचा एका गोष्टीचा आणि हवी असते भलतीच गोष्ट… अशा वृत्ती वा हेलकावे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा. ही झाली प्रामाणिकपणाची अगदी प्राथमिक श्रेणी. म्हणजे असे, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये प्रचंड अभीप्सा आहे, असा जोरकसपणे दावा करत असते, तिला ‘आध्यात्मिक जीवन हवे आहे’, असे ती म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या अगदी विरोधी अशा गोष्टी करत असते.

दुसरी श्रेणी : बरेचदा असे घडते… एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्या दोषांपासून सुटका हवी आहे” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या दोषांना खतपाणी घालते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, त्यांना घालवून देऊ नये म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडते. …या दुसऱ्या श्रेणीमध्ये व्यक्तीमधील एखादा भाग अभीप्सा बाळगून असतो आणि तो म्हणत असतो आणि तसा विचारही करत असतो की, आपल्यातील सारे दोष, अपूर्णता या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत. आणि अगदी त्याच वेळी, त्याच व्यक्तीमधील इतर भाग मात्र या दोषांना आणि अपूर्णतांना दडवून ठेवतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला त्यांना कोणी भाग पाडू नये, अशा रीतीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे (सर्वत्र आढळते).


Previous Post

असा जाईल आजचा दिवस तुम्हाला शुभ; जाणून घ्या, मंगळवार, १७ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

Next Post

प्रियकरासोबत पळून गेली विवाहिता! तरीही पहिल्यावर जीव होताच… मग हे केलं…

Next Post
प्रातिनिधीक फोटो

प्रियकरासोबत पळून गेली विवाहिता! तरीही पहिल्यावर जीव होताच... मग हे केलं...

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group