इंडिया दर्पण – विचार पुष्प – फक्त हे आवर्जून करुन पहा
जीवनात साधेपणा आणा, तुम्ही दुसऱ्यांना आदर्श असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
जीवनात आनंदीपणा आणा, तुम्ही स्तुत्य ठरल्याशिवाय राहणार नाही.
जीवनातील दिखाऊपणा टाकून द्या, तुमचे चारित्र्य प्रकाशित झाल्याशिवाय राहणार नाही.
जीवनांतून दिमाखाची हकालपट्टी करा, तुमच्या कार्यावर स्तुतीसुमने वाहिली जातील.
वागण्यातील उद्धटपणा टाकून द्या, तुमचा सर्वांकडून व सर्वत्र सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या जीवनात स्पर्धेस थारा देऊ नका, तुम्हास शत्रूच उरणार नाहीत, सारे मित्रच भेटतील.
हृदयमंदिराच्या प्रवेशद्वारी असलेल्या सूचनाफलकावर ‘कोणाचाही मत्सर करू नको’ ही अक्षरे ठळक कोरून ठेवा. हीच उच्च अभीप्सा आहे.