इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ढोंग व नाटकीपणा
अगदी एक कणभर प्रामाणिकपणादेखील पुरेसा असतो, आणि तुम्हाला ‘मदत’ मिळते. एखाद्याने खरोखर अगदी प्रामाणिकपणे धावा केला, खरोखर प्रामाणिकपणे साद घातली आणि व्यक्तीला अगदी प्रामाणिकपणे उत्तर हवे असेल, तर व्यक्ती प्रतीक्षा करते आणि ते उत्तर नेहमीच मिळते. मात्र, नुसती हाक मारायची आणि त्याच वेळी म्हणायचे, “बघू या, आपण यशस्वी होते का” तर अर्थातच ही काही योग्य अवस्था नाही. ढोंग आणि नाटकीपणाचा महासागर असण्यापेक्षा, प्रामाणिकपणाचा एक थेंब हा ‘शाश्वत चेतने’ च्या दृष्टीने, कितीतरी अधिक मूल्यवान असतो.