नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये वाहन आगीच्या घटनांनी मोठीच चिंता निर्माण केली आहे. कारण, अवघ्या काही तासातच तब्बल चौथी घटना समोर आली आहे. शहरालगत खासगी ट्रॅव्हल बस पेटल्याने पहाटे तब्बल १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दुपारी सप्तशृंग गडावर एसटी बस पेटली. त्यानंतर मनमाडजवळ सिलेंडर वाहतूक करणा-या ट्रकने पेट घेतला. या तिन्ही घटनेनंतर आता मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथे चालत्या ट्रकने पेट घेतल्याची चौथी घटना घडली आहे. आगीच्या या घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर, ट्रक पेटल्याने पिंपळगाव बसवंत परिसरही हादरला आहे. ट्रकला आग लागल्यानंतर पोलिसांसह स्थानिक सरकारी यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली आहे.
बघा या ट्रकला लागलेल्या आगीचा व्हिडिओ
Vehicle Fire Burn Fourth Incidence in Nashik Video
Pimpalgaon Basvant Truck Mumbai Agra Highway