India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वास्तू शंकासमाधान – आपल्या घरातील बैठकीची खोली कशी व कोठे असावी?

India Darpan by India Darpan
April 4, 2023
in व्यासपीठ
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण’च्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना आता विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळत आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी या सदराद्वारे शास्त्रोक्त माहिती दिली जात आहे.

या आठवड्याचा प्रश्न असा
आपल्या घरातील बैठकीची खोली कशी व कोठे असावी असा प्रश्न सौरभ माळी, अनिकेत कुलकर्णी, अनिता खैरनार यांनी विचारला आहे.
उत्तर असे

बैठकीची खोली म्हणजेच हॉल हॉलच्या फरशांचा उतार पूर्वेस किंवा उत्तरेस असावा.
हल्ला पुर्वेस व उत्तरेस मोठ्या आकाराच्या व जास्त खिडकी असणे उत्तम.
हॉलच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्यात खिडक्यांना रंगीत काचा किंवा फोटोसन ग्लासेस अजिबात लावू नये.
बैठक खोलीमध्ये शोभेचे झुंबर एकदम मध्यभागी असू नये. थोडी तरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे किंवा नैऋत्य कोपऱ्याकडे सरकलेले असावेत. म्हणजे हॉलच्या ब्रह्मस्थानी वजन पडणार नाही
हॉलमध्ये जिना नसावा.
हॉलमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एखादी देवाची मूर्ती अवश्य ठेवावी.
हॉलची बसण्याची व्यवस्था अशी करावी की कुटुंबप्रमुखाचे तोंड पूर्वेस किंवा उत्तरेस येईल.
टीव्ही देख एअर कुलर कॉम्प्युटर इत्यादी गोष्टी खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवल्यास उत्तम
हॉलमधील जड वस्तू कपाटे शोकेश इत्यादी गोष्टी खोलीच्या पश्चिम व दक्षिण भिंतीला ठेवल्यास उत्तम

वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.

वास्तू तज्ज्ञ प्रशांत चौधरी यांच्याविषयी…
वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.

 


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

कोरोनाचा कहर वाढत असल्याने आरोग्य विभागाने घेतला हा निर्णय

Next Post

कोरोनाचा कहर वाढत असल्याने आरोग्य विभागाने घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group