नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर करीत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही ही मर्यादा जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार आता युपीआयमधून तुम्ही दररोज १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. तुम्ही जर अॅमेझॉन पे वापरत असाल तर तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंतचे पैसे पाठवता येतील. त्यापूर्वी अॅमेझॉन पे युपीआय यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागले. त्यानंतर २४ तासांनी तुम्ही पैसे पाठवू शकता.
तुम्ही जर पेटीएम युपीआयद्वारे पैसे पाठवत असाल तर तुम्हाला १ लाख रुपये पाठवता येऊ शकतात. पेटीएमद्वारे तुम्ही दर तासाला २० हजार रुपयांपर्यंतचेच व्यवहार करु शकता. याशिवाय एका तासाला ५ व्यवहार आणि एका दिवसात फक्त २० व्यवहार तुम्ही करु शकता.
तुम्ही जर फोन पे युपीआयद्वारे पैसे पाठवत असाल तर तुम्हाला १ लाख रुपयांची मर्यादा आहे. त्याशिवाय दररोज तुम्ही १० ते २० व्यवहार करु शकतात. तुम्ही जर गुगल पे युपीआयद्वारे व्यवहार करीत असाल तर तुम्हाला १० व्यवहारांचीच मर्यादा आहे. ही मर्यादा संपल्यावर तुमचा कुठलाही व्यवहार होणार नाही.
UPI Online Payment Daily Limit Declare