India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धनुष्यबाण चिन्ह गमावल्यास उद्धव ठाकरे काय करणार? हा आहे पर्याय

India Darpan by India Darpan
January 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या वर्षीच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या अश्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकारण वेगळ्या अंगाने सुरू आहे. मूळ पक्षालाच आपलं निवडणुक चिन्ह राखण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून धनुष्यबाण कुणाचा, यासंदर्भात निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून धनुष्यबाण गमावण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे ठाकले आहे.

कुठल्याही लढाईत राजकीय पक्षांकडे दोन प्लॅन तयार असतात. विजय मिळाला तर आणि पराभव पत्करावा लागला तर, अश्या दोन्ही परिस्थितींमध्ये पुढे जाण्यासाठी राजकीय पक्ष तयार असतात. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही धनुष्यबाण गमावल्यास काय करायचे, याचा प्लान बी तयार ठेवला आहे. १७ जानेवारीला निवडणूक आयोगापुढे होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. अश्यात ठाकरे गटाच्या हातून धनुष्यबाण निसटण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जनतेच्या पुढे येऊन अनोखे आवाहन करू शकतात. त्यासाठी तयारी सुरू झाली असल्याचे कळते. मुळात निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर जनतेला आवाहन करून निर्णय बदलणार नाही. पण पक्षाचं नाव, पक्षाचे चिन्ह ठरविण्याची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे जनतेवर सोडू शकतात, असे बोलले जात आहे.

काय आहे प्लॅन बी
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिला तर, उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. यात ते आयोगाच्या निर्णयाला आव्हान देऊन चिन्ह आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न करतील. तर प्लॅन बीमध्येच दुसरा पर्याय जनतेवर निर्णय सोडण्याचा त्यांनी घेतला आहे. यात उद्धव ठाकरे जनतेकडूनच पक्षाचं नाव आणि चिन्ह मागवतील. आणि त्यानुसार अंमल करतील.

तर शिंदे गटाचा विजय
निवडणूक आयोगाच्या सुनावणीत सादिक अली केसचा आधार घेतला गेला, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निर्णय लागू शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिंदे गट निश्चिंत आहे. पण निर्णय काय लागतो, हे वेळच कळवेल.

Uddhav Thackeray Shivsena Symbol Big Challenge Politics
Election Commission


Previous Post

पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता; या वर्षीच सुरू होणार ही कामे

Next Post

नाशिक पदवीधर निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप

Next Post

नाशिक पदवीधर निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group