India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आता गौतम अदानी पाजणार पाणी! कुणाला? का? आणि कसे? घ्या जाणून…

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अदानी समूहाच्या भरभराटीत पायभूत सेवा उद्योगांचा महत्त्वाचा वाटा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याची मजल उद्योगपती गौतम अदानी यांनी मारली आहे. अदानी समूहामार्फत काही शहरांत घरोघरी वीजपुरवठा केला जातो. घरगुती गॅसचाही पुरवठा केला जातो. आता हाच दिग्गज समूह घरांमध्ये पाणीपुरवठ्याचेही काम करणार आहे. आजवर सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थाकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. पण, अदानी समूहाने याक्षेत्रात शिरकाव करीत पाणीपुरवठ्याची सशुल्क सेवा देण्याची तयारी केली असल्याची माहिती पुढे येत आहे.

अदानी समूह सध्या वीज, घरगुती गॅसचा पुरवठा करते. त्यात आता पाणीपुरवठा सेवाही जोडली जाणर आहे. अदानी समूह सध्या बंदर, विमानतळ, रस्ता, सिमेंट आणि एक्सप्रेस वे यांसारख्या सर्व प्रमुख व्यवसायांमध्ये अग्रेसर आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अदानी इंटरप्रायजेस आता पाण्याचे शुद्धीकरण ते वितरण क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात कंपनीने हे पाऊल ठेवले आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचा दावा करण्यात येत आहे.

लवकरच ‘एफपीओ’ येणार
अदानींची कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर घेऊन येत आहे. अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंग यांनी मीडियाला या प्रकल्पाची माहिती दिली. कंपनीने 20,000 कोटी रुपयांच्या इश्यूसाठी 3,112 रुपये ते 3,276 रुपये प्रति शेअर किंमत ठेवणार आहे. फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग पूर्णपणे नोंदणीकृत, सबस्क्राईब झाल्यास हा विक्रम ठरेल.

३१ जानेवारीला बंद
यापूर्वी 2015 मध्ये कोल इंडियाच्या 22,558 कोटी रुपयांच्या इश्यू आला होता. त्यानंतर अदानी समूहाचा मोठा इश्यू असेल. कोल इंडियाचा 15,199 कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर ऑक्टोबर 2010 मध्ये आली होता. कंपनीचा एफपीओ 27 जानेवारी रोजी उघडेल आणि 31 जानेवारी रोजी बंद होईल. मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एफपीओ एक दिवस अगोदरच उघडेल.

Tycoon Gautam Adani New Business Plan


Previous Post

अमित शहांसह दिग्गजांची मांदियाळी नाशिक दौऱ्यावर; अशी आहे भाजपची आगामी रणनिती

Next Post

दूधासंदर्भात सोशल मिडियात व्हायरल झालेला तो मेसेज खरा आहे का केंद्र सरकार म्हणाले…

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

दूधासंदर्भात सोशल मिडियात व्हायरल झालेला तो मेसेज खरा आहे का केंद्र सरकार म्हणाले...

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group