India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अनोखा योगायोग! नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार दोन पद्मविभूषण; या सोहळ्याचे ठरणार निमित्त

India Darpan by India Darpan
July 23, 2022
in साहित्य व संस्कृती
0
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात प्रथमच दोन पद्मविभूषण एकाच व्यसपीठावर येणार आहेत. हा योग जुळून येणार आहे येत्या १४ ऑगस्ट रोजी. निमित्त आहे ख्यातनाम इंजिनीअर अविनाश शिरोडे यांच्या अमृत महोत्सव आणि पुस्तक प्रकाशन समारंभाचे. भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू, परम संगणकाचे निर्माते पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे नाशकात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

गेल्या ५ दशकांहून अधिक काळापासून अंतराळ, इंजिनिअरींग, अध्यात्म, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असणारे प्रतिभावान, ऋषितुल्य, चतुरस्र व्यक्तिमत्व अशी इंजिनीअर अविनाश शिरोडे यांची ओळख आहे. अविनाश शिरोडे यांच्या वयाची पंच्याहात्तरी तसेच, पत्नी शर्मिष्ठा यांच्यासोबत विवाहाचा ५०वा वाढदिवस असा अनोखा योगायोग जुळून येत आहे. त्यानिमित्त अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिरोडे यांच्या आजवरच्या प्रदीर्घ कार्याविषयी व त्यांच्या जीवन प्रवासाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ‘अमृत’ सोहळा आयोजिण्यात आला आहे. याचनिमित्ताने शिरोडे यांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा घेणाऱ्या पुस्तकाचेही प्रकाशन दोन्ही मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच, शिरोडे यांच्या जीवन कार्यावरील लघुचित्रफीतही दाखविली जाणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड या छोट्याशा गावात शिरोडे यांचा जन्म झाला. त्यांनी तेथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. पुढे त्यांनी माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी अनेक शहरे पादाक्रांत केली. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. आणि कर्तबगारीच्या जोरावरच त्यांना भारतीय अंतराळशास्त्र संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) संधी मिळाली. त्याचे त्यांनी सोने केले. देशाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मात्र, कौटुंबिक कारणामुळे त्यांना इस्रोमध्ये पुढील कारकीर्द घडविता आली नाही. त्यानंतर ते नाशिकला स्थायिक झाले. पण, अनेक संस्था आणि देशांसाठी त्यांनी विविध प्रकल्प साकारले. म्हणूनच  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विविध पुरस्कारांनी त्यांचा आजवर गौरव करण्यात आला आहे. परिणामी, त्यांचा नावलौकिक जगभर आहे. त्यांच्या याच कार्याचा परिचय या विशेष सोहळ्यामध्ये होणार आहे.

..तर एका व्यासपीठावर आले असते तीन पद्मविभूषण
अमृत महोत्सव सोहळ्यासाठी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती. मात्र, १४ ऑगस्ट रोजीच पद्मविभूषण डॉ. माशेलकर यांचा पुणे येथे एक कार्यक्रम आहे. त्यामुळे ते नाशकातील अमृत महोत्सव सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, ते ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जर तीन पद्मविभूषण एकाच व्यासपीठावर आले असते तर नाशिकमध्ये मोठ्या इतिहासाची नोंद झाली असती.

Two Padma Vibhushan Personalities will be on same dais in Nashik


Previous Post

‘सुहास कांदे, हे बघा आणि आता आमदारकीचा राजीनामा द्याच’; शिवसेनेचे खुले आव्हान

Next Post

पुन्हा कोसळधार! पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामान विभागाचा अंदाज

Next Post
प्रातिनिधिक फोटो

पुन्हा कोसळधार! पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामान विभागाचा अंदाज

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group