मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीव्हीवर काही मालीका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहेत त्यापैकीच एक म्हणजे तू तेव्हा तशी मालिका होय, ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. आपल्या मनातील भावना अनामिका व्यक्त करू शकेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
प्रत्येकासाठीच पहिल्या प्रेमाचे आयुष्यात खूप विशेष स्थान असते आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचे राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
दि. २० मार्चपासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारत आहे.
‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकरने संगीतबद्ध केलं आहे. तसेच अभिनेता स्वप्निल जोशी याने एकापेक्षा एक असे मराठी हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सर्व माध्यमात त्याने काम केले आहे. पण आता ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचा आणखी लाडका बनला आहे.
सौरभ देणार अनामिकाला धीर.
आज, रात्री ८:०० वा. #TuTevhaTashi #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/LVWgohg3Mz
— Zee Marathi (@zeemarathi) July 7, 2022
‘तू तेव्हा तशी’ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील पट्या ( स्वप्निल जोशी) आणि अनामिकाची ( शिल्पा तुळसकर ) अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना भलतीच आवडली. प्रेक्षकांना मालिकेत आता पुढे पाहायला मिळेल की बाहेरगावी गेलेली वल्ली मुद्दम सौरभच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येते आणि अनामिकाला घेऊन येते या बोलीवर ती अनामिकाकडे जाते. पण इकडे सौरभचा निर्णय पक्का आहे. तो बेंगळुरूला निघाला आहे.
दरम्यान, वल्ली अनामिकाला सगळं सांगते आणि अनामिका सौरभला थांबवायला निघते. पण वल्लीने अनामिकाला मुद्दाम चुकीचा पत्ता देते. अनामिका तिथे पोहोचू नये यासाठी वल्ली अनेक प्रयत्न करते पण अखेर अनामिका तिथे पोहोचते. आता अनामिका सौरभला गाठू शकेल का? तिच्या प्रेमाची कबुली देईल का? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.
Tu Tevha Tashi Marathi TV Serial Love Story Zee Marathi Shilpa Tulaskar Swapnil Joshi