मुंबई – भारतीय जनता पक्षाविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मोहिम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या भेटीत त्यांनी काँग्रेसलाच लक्ष्य केले. त्यामुळे त्यांचा हा दौरा गुण्यागोविंदाने चाललेल्या महाविकास आघाडी सरकारच्या संसारात बिब्बा घालण्यासाठी होता की काय अशी शंका आल्यावाचून राहत नाही. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. बघा हा व्हिडिओ