इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानमध्ये आज लाहोर शहरात एका पाठोपाठ तीन बॉम्ब स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. हे बॅाम्ब स्फोट लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ झाले. हे हल्ले मिसाईलद्वारे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर लाहोर एअरपोर्ट तात्काळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक उड्डाण प्रभावित झाली आहेत. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाहोरमधील वॅाल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद भागात हे स्फोट झाले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर हा दुसरा मोठा हल्ला पाकिस्तानवर झाला असतांना दुसऱ्याबाजूला बलोच लिबरेशन आर्मी BLA ने त्यांच्या नाकात दम केला आहे. मंगळवारी BLA ने पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला टार्गेट केले होते. त्यातही अनेक सैनिक मारले गेले.आता पुन्हा त्यांनीच हा मोठा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात इमारतींच मोठे नुकसान झाले आहे. लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आल्यानंतर नागरिक घराच्या बाहेर एकत्र जमले आहेत. परिसरात दहशतीच वातावरण आहे. पाकिस्तानच्या समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरच्या वॉल्टन रोडवर जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. वॉल्टर एअरपोर्टजवळ असलेल्या लाहोरच्या गोपाळ नगर आणि नसीराबाद भागात लागोपाठ ब्लास्ट झाले. सायरन वाजल्यानंतर लोक तात्काळ घराच्या बाहेर निघून आले.