नवी दिल्ली – आधुनिक विज्ञान युग हे समतेची आणि समानतेचे मानले मानले जाते. सहाजिकच जाती, धर्म, लिंग, भाषा, वर्ण, वर्ग या सारख्या भेदभाव विरहित समाजाची रचना असावी, असे समाजशास्त्रज्ञांना वाटते. त्या दृष्टीने जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्व जगात असे काही घटक आहेत की, जे अद्यापही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित उपेक्षित आणि दुर्लक्षित मानले जातात. किंबहुना त्यांचा तिरस्कार करण्यात येतो. त्यामध्ये प्रामुख्याने देहविक्रय करणाऱ्या महिला किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच तृतीयपंथीय यांचा समावेश होता. परंतु हा वर्ग देखील समाजाचा एक घटक आहे, असे समजून त्यांच्या उन्नतीसाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्यासाठी ब्रिटनमधील एका विद्यापीठाने कोर्स सुरू केला आहे.
वेश्या व्यवसायात काम करणाऱ्यांना मदत करण्यासाठी इंग्लंडच्या डरहम विद्यापीठाने प्रशिक्षण सुरू केले आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा व्यवसाय कायदेशीर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डरहम विद्यापीठ वेश्या व्यवसायासाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने वेश्या व्यवसायात गुंतलेल्या किंवा घराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी एक विशेष अभ्यासक्रम देऊ केला आहे. विद्यार्थी संघटनेने सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना जाहिरातीद्वारे ई-मेल पाठवला आहे.
डरहम स्टुडंट युनियनने स्वतःच वेश्या व्यवसायासाठी ऑनलाइन कोर्स तयार केला आहे. वेश्या व्यवसाय उद्योगाशी संबंधित कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी हा कोर्स खास तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश यात सहभागी असलेल्या व्यक्तींना सुरक्षित ठेवण्याचा आहे. तर दुसरीकडे या विचित्र अभ्यासक्रमाबाबत विरोधही सुरू झाला आहे.
उच्च शिक्षण राज्यमंत्री मिशेल डोनेलन यांनी हा धोकादायक उद्योग कायदेशीर करणे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण कर्तव्याचे घोर उल्लंघन केल्याबद्दल विद्यापीठावर टीका केली आहे. त्याचप्रमाणे डरहम विद्यापीठ आणि विद्यार्थी संघटनेकडे काही विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. हा अभ्यासक्रम सुरू केल्याने काही विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कॅम्पसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची भावना निर्माण होईल, अशी या विद्यार्थ्यांची तक्रार आहे.