India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पिंपळगांव येथील बर्ड फीडर ठरले जगातील सर्वात मोठे; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

India Darpan by India Darpan
September 24, 2022
in स्थानिक बातम्या
0

पिपंळगाव बसवंत – येथील अमी जीवदया संस्थेद्वारे जगातील सर्वात मोठ बर्ड फीडर तैय्यार कऱण्यात आले आहे. १५४३ पाऊंड (७०० किलो) धान्य बसेल इतके अजस्त्र बर्ड फीडर असून याची नोंद गिनीज वर्ड रिकार्डस मध्ये झाली आहे. वाढते शहर व वाढते प्रदुषण यामुळे चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे संवर्धन व्हावे, त्यांचा किलबिलाट वाढावा, त्यांना खाण्यासाठी धान्य मिळावे या हेतुने हे बर्ड फीडर बनविण्यात आले आहे. या विश्वविक्रमाद्वारे द्वारे जगभरात हा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

अमी जीवदया ही संस्था २००९ पासून पशुसंवर्धनासाठी काम करीत आहे. या अगोदर हा विक्रम अमेरिकेतील वेस्ट वर्जिनिया येथील विल्यम डान ग्रीने या रिटायर्ड शिक्षकाने ७६० पाऊंड (३४५ किलो) धान्य बसेल एवढे मोठे बर्ड फीडर बनविले होते, त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रिकार्डस मध्ये होती. तो रिकार्ड मोडुन आता १५४३ पाऊंड (७०० किलो) चे बर्ड फीडर ची नोंद झालेली आहे.
अमी जीवदया संस्थेचे अध्यक्ष पिंपळगाव येथील हरीश हिरालाल शाह यांनी सांगितले कि, एवढे मोठे बर्ड फीडर बवनिणे हे आमच्या कुवतीच्या बाहेर होते, परंतु अनेक लोकांच्या सहकार्यांने ते संपन्न झाले. यामध्ये आकर्टेक्ट म्हणुन योगेश वाघचौर नाशिक यांनी डिजाईन करुन दिली ज्यामध्ये ७५ किलो धान्य बसत होते. नंतर त्यामध्ये सुधारणा करुन या स्वरुपात बनविण्याचे ठरले. अंबड नासिक येथील दिलीप कोचचे मालक दिलीप व नागेश पिंगळे यांनी फ्रेबिकेशन करुन याला स्वरुप दिले. नाशिक येथील शुभम महाडिक यांनी यावर सुंदर अशी पेटिंग केली मनोज सोनी, शफिक शेख पिंपळगांव यांनी साक्षीदाराची भूमिका निभावली. स्मित शाह, अनिल माळी, संदीप बैरागी, प्रणव भोपाळे कोल्हापुर, शामलाल मिस्तरी, संजय आहेर(पोलिस), अमन शाह, तनवीर काझी यासहित माझ्या परिवारातील सर्वांनी मला या कार्यासाठी मदद केली. या बर्ड फीडर चे सर्व माहिती गिनीज वर्ड रिकार्डस संस्थेला पाठविली व त्यांनी ३० आँगस्ट २०२२ ला माझ्या बर्ड फीडर नोंद जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर म्हणुन केली व त्याचा सर्टिफिकेट मला पाठविले, सदर बर्ड फीडर हे रानमाळा, पिपंळगांव येथे बघण्यासाठी ठेवलेले आहे. या फीडर ला १०८ खिडक्या असून त्यामध्ये दिवसभरात हजारों पक्षी धान्य खाण्यासाठी येत आहेत.


Previous Post

जेपी नड्डा म्हणाले, एम्सची भव्य इमारत उभारली… दोन खासदारांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली ही पोलखोल…

Next Post

पुला अभावी विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांना पाण्यातून करावा लागतोय प्रवास..(बघा व्हिडिओ)

Next Post

पुला अभावी विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांना पाण्यातून करावा लागतोय प्रवास..(बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group