इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जिओ एअरफायबर ८१ टक्के बाजार हिश्श्यासह फिक्स्ड वायरलेस क्षेत्रात आघाडीवर. सक्रीय ग्राहक वाढ दर्शवणारी एकमेव दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने एप्रिल २०२५ मध्ये महाराष्ट्रात १.३३ लाख नवीन मोबाईल ग्राहकांची नोंद करत सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.
राज्यात, फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) क्षेत्रात जिओ आपल्या नेतृत्वाची पुनःस्थापना करत असून, जिओ एअरफायबर सेवा हा स्पष्ट अग्रगण्य पर्याय ठरतो आहे. एप्रिल २०२५ मध्ये महाराष्ट्रातील सक्रीय जिओ एअरफायबर वापरकर्त्यांची संख्या ५,०७,०९६ इतकी झाली असून, मार्चमधील ४,६७,५८३ वापरकर्त्यांपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. तुलनेत, भारती एअरटेलचे फक्त १,१७,७३८ FWA ग्राहक होते.
एप्रिल २०२५ मध्ये देशपातळीवर फक्त जिओ ने सक्रीय ग्राहकांमध्ये वाढ नोंदवली असून, ५५ लाखांहून अधिक नवीन सक्रीय वापरकर्त्यांची भर पडली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात VLR (Visitor Location Register) नोंदणी ५० लाखांच्या वर गेली आहे. दुसऱ्या बाजूला व्ही आणि बीएसएनएल सारख्या अन्य कंपन्यांनी ग्राहक गमावले आहेत.
राष्ट्रीय पातळीवर जिओ ने फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस बाजारात ८२ टक्के हिस्सेदारीसह निर्विवाद आघाडी कायम ठेवली असून, देशभरात जिओ च्या FWA ग्राहकांची संख्या ६,०१,४०० इतकी आहे.
एप्रिल 2025 हा महिना एकूण फिक्स्ड ब्रॉडबँड क्षेत्रातही विक्रमी ठरला, कारण जिओ च्या वायरलाइन व FWA सेवांद्वारे सुमारे 9.10 लाख नवीन ग्राहक जोडले गेले, जे एअरटेल च्या २.३० लाख ग्राहकांच्या तुलनेत जवळपास चार पट अधिक आहेत.
राष्ट्रीय स्तरावर जिओ ने एप्रिल महिन्यात एकूण २६.४४ लाख नवीन ग्राहक जोडले, ज्यामुळे त्यांचा एकूण ग्राहक आधार ४७.२४ कोटींवर पोहोचला आणि मोबाईल विभागात ४०.७६ % बाजारहिश्श्यासह अव्वल स्थान मिळवले. एअरटेल चा हिस्सा ३३.६५ % (सुमारे ३९ कोटी ग्राहक), व्होडा आयडिया चा १७.६६ % (२०.४७ कोटी ग्राहक), तर बीएसएनएल आणि एमटीएनएल मिळून ७.८४ % इतका होता.
जिओ च्या जलद नेटवर्क विस्तार, परवडणाऱ्या योजना आणि एकत्रित डिजिटल सेवांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गृह व व्यावसायिक कनेक्टिव्हिटीमध्ये आमूलाग्र बदल घडतो आहे. शहरी व ग्रामीण भागांतून वेगवान इंटरनेटची वाढती मागणी लक्षात घेता, जिओ ही डिजिटल दरी मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.