India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

WhatsAppमध्ये येणार हे नवे अपडेट; आता येणार मजाच मजा

India Darpan by India Darpan
October 10, 2022
in मुख्य बातमी
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर सतत नवीन फीचर्सचा लाभ यूजर्सना मिळतो आणि आता त्याच्या ग्रुप मेसेजिंग सिस्टममध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. यापूर्वी एका ग्रुपमध्ये केवळ २५६ सदस्यांचा समावेश होता, तर आता कमाल सदस्य संख्या ५१२ झाली आहे. नवीन अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की, ग्रुप सदस्यांची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते आणि ती पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे.

इतर मेसेजिंग अॅप्सच्या तुलनेत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कमी सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र, नव्या बदलांनंतर हा फरक संपणार आहे. हे उघड झाले आहे की लवकरच १०२४ सदस्य व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकतील. या नवीन मर्यादेची चाचणी घेतली जात आहे. अशाप्रकारे, एकाच वेळी हजाराहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि ग्रुप मेसेजिंगचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

वुई बिटा इन्फोने व्हॉटसअॅप अपडेट्सच्या दिलेल्या माहितीनुसार, मेटा-मालकीचे अॅप विद्यमान ५१२ सहभागींच्या गट मर्यादांमधील बदलांची चाचणी घेत आहे. आता अॅडमिनला एका ग्रुपमध्ये १०२४ सदस्य जोडण्याचा पर्याय दिला जात आहे. या फीचरची बीटा यूजर्ससोबत चाचणी केली जात असून निवडक बीटा यूजर्सना या फीचरचा लाभ मिळत आहे.

अधिक चांगली गोपनीयता देत, व्हॉट्सअॅपने आपले व्ह्यू वन्स वैशिष्ट्य बदलले आहे. आतापर्यंत व्ह्यू वन्स फीचरसह पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेतले जाऊ शकत होते. आता वापरकर्ते व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाहीत आणि त्यांना हा पर्याय मिळणे बंद झाले आहे. म्हणजेच, व्ह्यू वन्स सह पाठवलेल्या मीडिया फाइल्सवर यूजर्सना चांगली गोपनीयता मिळेल.

व्हॉट्सअॅप बिझनेस वापरकर्त्यांसाठी प्रीमियम सेवेची चाचणी देखील केली जात आहे, निवडक वापरकर्त्यांना अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा लाभ देत आहे. लहान आणि मोठ्या व्यवसायांना प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेचा लाभ मिळेल, जेणेकरून ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकतील. मात्र, याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.

Technology WhatsApp New Updates Coming Soon


Previous Post

झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; येतेय ही नवी मालिका

Next Post

मुख्यमंत्र्याच्या सचिवाला अब्दुल सत्तारांची शिवीगाळ? सत्तार यांनी स्पष्टपणे सांगितलं..

Next Post

मुख्यमंत्र्याच्या सचिवाला अब्दुल सत्तारांची शिवीगाळ? सत्तार यांनी स्पष्टपणे सांगितलं..

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group