मुंबई – कोणत्याही शासकीय खात्यात नोकरी मिळावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते किंबहूना स्वप्न देखील असते. त्यासाठी अनेक तरुण कठोर परिश्रम करीत या संदर्भातील स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रात शिक्षक, तसेच टपाल, रेल्वे, किंवा शासकीय कार्यालयात नोकरी मिळाल्यास अधिक सुखसोयी उपलब्ध होतात, परंतु मुख्य अडथळा असतो तो स्पर्धा परीक्षेचा. परंतु आता रेल्वे मध्ये शिक्षकांच्या जागा भरणार असून विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी ही मोठी संधी आहे. मध्य रेल्वेमार्फत शिक्षकांच्या अनेक पदांवर रिक्त जागा भरल्या आहेत, ज्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही आणि ही निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल. या रिक्त जागा मुंबईतील टीजीटी, पीजीटी आणि प्राथमिक शिक्षकांसाठी आहेत. PGT साठी मूळ वेतन 27,500 रुपये प्रति महिना, TGT साठी प्रति महिना 26,250 रुपये आणि प्राथमिक शिक्षकांसाठी 21,250 रुपये प्रति महिना असेल. याशिवाय या शिक्षकांना रेल्वेच्या इतर भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.
या आहेत महत्त्वाच्या तारखा
PGT साठी वॉक-इन मुलाखत – २५ नोव्हेंबर २०२१
TGT साठी वॉक-इन मुलाखत – २६ नोव्हेंबर २०२१
प्राथमिक शिक्षकांसाठी वॉक-इन मुलाखत – २७ नोव्हेंबर २०२१ अशा आहेत.
मुलाखतीसाठी पत्ता – प्रिन्सिपल चेंबर ऑफ वेल्फेअर विभाग, मध्य रेल्वे माध्यमिक (EM) शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण जि. ठाणे असा आहे.
या रिक्त जागांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रक्रिया ऑफलाइन आहे आणि अर्ज भरून नियोजित तारखेला आणि मुलाखतीच्या वेळी पत्त्यावर पोहोचावे लागेल. याच ठिकाणी अर्ज लगेच सादर करता येईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे