पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतातील प्रसिद्ध कार निर्माता टाटा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर दिली आहे. आपण जर या महिन्यात म्हणजे जानेवारीत टाटा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यात 85 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळू शकते, विशेष म्हणजे ही खूप मोठी किंमत आहे. ज्या गाड्यांवर ही सूट उपलब्ध आहे, त्यांची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
जानेवारी महिन्यासाठी, टाटा डीलरशिप हॅरियर आणि सफारी एसयूव्ही, टिगोर कॉम्पॅक्ट सेडान, टियागो आणि अल्ट्रोझ हॅचबॅक, नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह विविध मॉडेल्सवर रोख सवलत आणि इतर ऑफर देत आहेत. कोणत्या मॉडेल्सवर टाटा ही सूट देत आहे आणि याद्वारे तुम्ही किती पैसे वाचवू शकता. चला जाणून घेऊ या…
टाटा हॅरियर
टाटा हॅरियर 2021 या मॉडेलवर 60,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि एक्सचेंज बोनससह खरेदी केले जाऊ शकते, तर 2022 हॅरियर या मॉडेल 40,000 च्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. याशिवाय, हॅरियरवर 25,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील आहे. अशा प्रकारे 2021 मॉडेल खरेदी करून एकूण 85000 रुपयांपर्यंतची बचत करता येईल.
टाटा सफारी
टाटा सफारी 2021 च्या मॉडेलवर सर्व प्रकारांवर एक्सचेंज बोनस आणि 60,000 रुपयांपर्यंत रोख सवलत मिळू शकते. खरेदीदारांना 2022 मॉडेल वर्षासाठी 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
टाटा टिगोर
टाटा टिगोर 2021 आणि 2022 टिगोरवर 25,000 रुपये आणि 20,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि एक्सचेंज बोनस देत आहेत. यासोबतच 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.
टाटा टियागो
सन 2021 टियागोवर 25,000 रुपयांची ऑफर दिली जात आहे, तर 2022 मॉडेलवर 20,000 रुपयांपर्यंतची ऑफर आहे. या महिन्यात टियागोवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे.
टाटा नेक्सॉन
टाटा नेक्सॉन 2021 च्या डिझेल मॉडेलवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. याशिवाय, नेक्सॉन पेट्रोलवर 5,000 रुपयांपर्यंत आणि नेक्सॉन डिझेलवर 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे.
टाटा अल्ट्रोझ
जानेवारी 2022 च्या मॉडेलसाठी, टाटा डीलरशिप अल्ट्रोझ डिझेलवर 10,000 रुपयांपर्यंत आणि पेट्रोलवर 7,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देत आहेत.