इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या अतिशय लोकप्रिय मालिकेच्या चाहत्यांना एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. मालिकेतील पात्र असलेल्या दया बेन (दिशा वाकानी) हिने यापूर्वीच मालिका सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता (शैलेश लोढा) मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. हे सारे कमी म्हणून की काय आता बबिता (मुनमुन दत्ता) सुद्धा मालिका सोडण्यार असल्याची वार्ता येऊन धडकली आहे. तसे झाले तर मालिकेतील पात्र जेठालाल (दिलीप गांधी) हे एकटे पडणार आहेत.
‘तारक मेहता’मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत कोणताही कलाकार शो सोडतो तेव्हा चाहत्यांची निराशा होते. शैलेश आणि निर्मात्यामध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. मात्र, दोघांनीही अद्याप काहीही सांगितलेले नाही. ‘तारक मेहता’ सोडल्यानंतर शैलेश लोढा शेमारू टीव्हीवर ‘वाह भाई वाह’ शो करणार आहे. त्याचा टीझरही समोर आला आहे. आता या मालिकेला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसतंय. बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता देखील या शोला अलविदा करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
मुनमुन दत्ताबद्दल यापूर्वी अनेकदा अशी अटकळ होती की ती हा शो सोडणार आहे पण तिने प्रत्येक वेळी त्याचा इन्कार केला. आता ताज्या अहवालानुसार, मुनमुन दत्ताला ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन 2 साठी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. या शोसाठी स्पर्धकांचा शोध सुरू झाला आहे. मुनमुन दत्ता ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही पण जर तसे झाले तर निर्माते आणि चाहत्यांची नक्कीच निराशा होईल.
‘बिग बस 15’मध्ये मुनमुन दत्ता चॅलेंजरच्या भूमिकेत दिसली होती. सुरभी चंदना, आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी हे तिकीट टू फिनाले टास्कसाठी त्याच्यासोबत होते. जर मुनमुनने ‘बिग बॉस ओटीटी’ केले तर ते लवकरच निश्चित होईल. त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.