India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हुंड्यासाठी सूनेचा छळ; सुप्रिम कोर्टाने सासूला दिली ही कठोर शिक्षा

सुनेसोबत एक महिला क्रूर व्यवहार करत असेल तर तो गंभीर गुन्हाः न्यायालयाचे स्पष्ट मत

India Darpan by India Darpan
January 13, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हुंडाबळीच्या एका प्रकरणात सासूला दोषी ठरवताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एक महिला आपल्या पुत्रवधूसोबत क्रूर व्यवहार करते तेव्हा तो गुन्हा खूपच गंभीर होतो. एक महिला दुसर्या महिलेचे संरक्षण करू शकत नसेल, तर सून असलेली दुसरी महिला आणखी असुरक्षित होईल, असे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

दागिन्यांसाठी छळ
सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश सुनावला आहे. महिलेला मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ अंतर्गत दोषी ठरविले होते. जावई, सासू, नणंद, आणि सासरे आपल्या मुलीचा दागिन्यांसाठी छळ करत होते. त्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पीडितेच्या आईने केली होती.

३ महिने सश्रम कारावास
खालच्या न्यायालयाने पुराव्यांच्या आधारावर सासर्यांची सुटका केली होती. तर इतर आरोपींना दोषी ठरवले होते. खालच्या न्यायालयाने आरोपींवर कलम ४९८ अ अंतर्गत गुन्ह्यासाठी एक वर्षाचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड तसेच कलम ३०६ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. खालच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने अंशतः स्वीकारले होते. सर्व आरोपींना भादंविच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्ह्यातून मुक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अपिलकर्ता महिलेचे वय (८०) पाहता शिक्षेचा काळ घटवून तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.


Previous Post

‘या’ जिल्ह्यातील मतदार चक्क हेलिकॉप्टरने जाणार मतदानाला

Next Post

फूड डिलिव्हरी बॉयचा ४ लाखांना गंडा; फूड कंपनीची अशी केली फसवणूक

Next Post

फूड डिलिव्हरी बॉयचा ४ लाखांना गंडा; फूड कंपनीची अशी केली फसवणूक

ताज्या बातम्या

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

June 10, 2023
प्रातिनिधीक फोटो

CRPFचा रंगीला जवान… १३ वर्षात केले ५ लग्न… असा झाला भांडाफोड… आता काय होणार

June 10, 2023

प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली

June 10, 2023

छोट्या पडद्यावर क्रांती रेडकरचे पुनरागमन

June 10, 2023

खासदाराने संसदेत केले स्तनपान….. सर्व खासदारांनी वाजविल्या टाळ्या

June 10, 2023

अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात झाले हे महत्त्वाचा निर्णय

June 10, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group