सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तरुणीचे व्हिडिओ काढणाऱ्या आरोपीला कोर्टाने दिला जामीन; कारण…

by India Darpan
जुलै 11, 2021 | 6:22 am
in संमिश्र वार्ता
0
suprime court

नवी दिल्ली – एमबीएच्या एका तरुणीचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कोऱ्या कागदावर जबरदस्तीने हस्ताक्षर करवून घेणाऱ्या आरोपीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. तरुणीला आपली पत्नी दाखविण्यासाठी खोटे विवाहपत्र (निकाहनामा) तयार करण्यास कोऱ्या कागदाचा वापर केल्याचा आरोप हसीब खान नावाच्या संशयितावर आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारकर्ती न्यायालयासमोर हजर झाली नाही. तसेच आरोपी खान दोन वर्षांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिलेला आहे. या प्रकरणात आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपीला जामीन दिला जाऊ शकतो, असे खंडपीठाने सांगितले.
तक्रारकर्त्या तरुणीच्या म्हणण्यानुसार, ती हसीब खानकडून कपडे शिवून घेत होती. एकदा कपड्यांचे माप व्यवस्थित घेण्यावरून हसीबने तिला आपल्या दुकानातच ट्रायल घेण्याचा सल्ला दिला. दुकानात ट्रायल रूम नव्हती. त्यामुळे दुकानाचे शटर खाली करून तिने कपडे घालून पाहिले. त्याचदरम्यानचा व्हिडिओ असून तो व्हायरल करण्याची धमकी देत हसीब खानने तरुणीला ब्लॅकमेल करत होता.
त्यानंतर हसीबने जबरदस्तीने कोऱ्या कागदावर तिच्या सह्या घेऊन ऊर्दूमध्ये इनाया खान असे लिहून घेतले. या कागदाचा वापर करून त्याने निकाहनामा तयार करून घेतला. परंतु तरुणी आणि हसीबमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनीही लग्न केले, असा दावा आरोपी हसीबने केला. तरुणीने या दाव्यांना फेटाळून लावले.
व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्याशी वाईट कृत्य करत होता. शेवटी तक्रारकर्त्या तरुणीने आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली. तिच्या पालकांनी हसीब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
कुटुंब न्यायालयात याचिका
आरोपी हसीब खानने भारतीय दंडविधानाच्या कलम १२५ अंतर्गत तरुणीला घरी घेऊन जाण्यासंदर्भात प्रकरण नोंदविले. लखनऊ येथील कुटुंब न्यायालयात आरोपीने निकाहनाम्याच्या आधारावर तक्रारकर्त्या तरुणीला आपली पत्नी असल्याचे सांगितले.
दोनदा फेटाळला जामीन
हसीबने दोनदा अलाहाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. परंतु दोन्ही वेळा उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारचा ठाम निश्चय! देशाचा इतिहास बदलणार; पण हा…

Next Post

पंकजा मुंडे या अचानक दिल्लीला रवाना; समर्थकांचीही बोलवली बैठक

Next Post
pankaja munde

पंकजा मुंडे या अचानक दिल्लीला रवाना; समर्थकांचीही बोलवली बैठक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011