India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुप्रीम कोर्टाने घेतला हा मोठा निर्णय

India Darpan by India Darpan
April 5, 2023
in Short News
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी वकिलांना मोठी सूट दिली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना ऑनलाईनरित्या न्यायालयात हजर राहण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, ‘कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे वर्तमानपत्रातील रिपोर्ट्स दाखवतात. अशा परिस्थितीत वकिलांना न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने हजर राहायचे असेल तर ते तसे करू शकतात. ते हायब्रिड (ऑनलाईन) मोडमध्ये देखील कार्य करू शकतात.

आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ४४३५ लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या १६३ दिवसांच्या आकडेवारीत हा उच्चांक आहे. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ९१ वर पोहोचली आहे. सक्रिय केस म्हणजे ज्या रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या २४ तासात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. संसर्गामुळे आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार ९१६ मृत्यू झाले आहेत.

आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या चार दिवसांत मृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, ४० जणांना आपला जीव गमवावा लागला. १ एप्रिल रोजी पाच जणांचा मृत्यू झाला होता. २ एप्रिलला ११, ३ एप्रिलला ९ आणि ४ एप्रिलला १४ जणांचा मृत्यू झाला.

Supreme Court Covid Virus Infection Lawyers


Previous Post

Good News नाशकात ही कंपनी करणार १६० कोटींची गुंतवणूक; मोठा रोजगारही निर्माण होणार

Next Post

चिंताजनक! कोरोनाचा संसर्गात भारत टॉप१० देशांमध्ये; मृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले

Next Post

चिंताजनक! कोरोनाचा संसर्गात भारत टॉप१० देशांमध्ये; मृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group