रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शाब्बास जळगावकरांनो! कोरोना हॉटस्पॉट ते कोरोनामुक्ती; दिलासादायक वाटचाल

by India Darpan
जुलै 7, 2021 | 11:50 am
in राज्य
0

प्रतिनिधी, जळगाव
काही महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढत होता, तेव्हा जळगाव जिल्हा हा संपूर्ण देशात हॉटस्पॉट म्हणून चर्चेला आला होता. मात्र प्रशासनाने उपाययोजनांबाबत घेतलेली गंभीर दखल आणि त्याला जनतेने दिलेली साथ याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यात नोंद होत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली असल्याचे  दिसून येत आहे.
     साधारणतः फेब्रुवारी मार्चनंतर राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये धोरणाचा संसर्ग वाढल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. त्याच वेळी खानदेशातील जळगाव जिल्हा हा  जणूकाही कोरोनाचे हॉटस्पॉट बनला होता. मात्र आता जिल्हाभरात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू खूपच कमी झाली आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या सध्या नाहीच्या बरोबर असली तरी कोरोनाची भिती अद्याप तरी संपलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
     जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या ३६६ इतकी आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीसच्या आत बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. शिवाय पॉझिटीव्हिटी दरही एक टक्के आलेला असल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियत्रण मिळविण्यात यश मिळाल्याच्या मागील कारणाबाबत विचार केला तर दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम राबविली होती. यामध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन यांचा वापर करण्यासंदर्भात करण्यात आलेली जनजागृती आणि जिल्ह्यातील आठ लाख लोकांना करण्यात आलेले लसीकरण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं असल्याचं दिसत असले तरी कोरोना अद्याप पूर्णपणाने संपलेला नाही. त्यामुळे पुढील काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांना लस घेण्याचे  आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात या ४३ जणांची नावे पक्की; पहा यादी

Next Post

कोरोना निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे निर्देश

Next Post
cm meeting 1 1140x570 1

कोरोना निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011