India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रसिद्ध कॉफी कंपनी स्टारबक्सच्या सीईओपदी नियुक्त झालेल्या लक्ष्मण नरसिह्मन यांना मिळेल एवढे वेतन

India Darpan by India Darpan
September 12, 2022
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्टारबक्स या प्रसिद्ध कॉफी कंपनीने भारतीय वंशाच्या लक्ष्मण नरसिह्मन यांची कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ते कंपनीचे विद्यमान सीईओ हॉवर्ड शुल्स यांची जागा घेतील. दि. १ ऑक्टोबर रोजी लंडन येथून सिएटल स्थानांतरीत झाल्यानंतर ते स्टारबक्समध्ये सहभागी होतील. कंपनी त्यांना तब्बल १४० कोटी रूपयांचं वार्षिक वेतन देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एका रिपोर्टनुसार, त्यांना वार्षिक ११७.५ मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रूपयांमध्ये १४० कोटी रूपयांच वेतन मिळणार  आहे. त्यांना रेकिट बेंकिसरमध्ये वार्षिक ६ दशलक्ष पौंड म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये ५५ कोटी रूपयांचे वेतन मिळत आहे. कंपनीच्या अनेक गोष्टींमध्ये सकारात्मरक बदल करण्याची जबाबदारी लक्ष्मण नरसिह्मन यांच्या खांद्यावर असेल. रेकिट बेंकिसरचं मूल्य ४५ बिलियन पौंड आहे, तर दुसरीकडे स्टारबक्सचा उत्पन्न जवळपास ८७ बिलियन पौंड असल्याचं गार्डियनच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. यामुळेच नरसिह्मन यांना मिळणारे इन्सेटिव्ह्सही अधिक असतील.

यापूर्वी नरसिह्मन यांनी पेप्सिकोमध्येही अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. यामध्ये चीफ कमर्शिल ऑफिरसची भूमिकाही महत्त्वाची होती. त्यांनी कंपनीच्या लॅटिन अमेरिका, युरोप आणि आफ्रिका व्यवसायाचे सीईओ म्हणूनही काम केले असून त्यांनी कन्सल्टिंग फर्म मॅकिन्से अँड कंपनीमध्ये सीनिअर पार्टनर म्हणूनही काम केलंय. याठिकाणी त्यांनी अमेरिका, आशिया आणि भारतात आपले ग्राहक, टेक्नॉलॉजी प्रॅक्टिसवर लक्ष केंद्रित केले होते.

Starbucks CEO Laxman Narsimhan Salary
Multinational Coffee Company


Previous Post

आलिशान मर्सिडीज कारमधून रेशनचे धान्य नेतानाचा तो व्हिडिओ खरा आहे की खोटा?

Next Post

येत्या २२ सप्टेंबरपासून रुपी बँक होणार बंद; तुमच्या पैशांचे काय?

Next Post

येत्या २२ सप्टेंबरपासून रुपी बँक होणार बंद; तुमच्या पैशांचे काय?

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group