नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवर आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने विशेष गोवर लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. याच अंतर्गत नाशिक शहरासह जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहिम 15 ते 25 डिसेंबर दरम्यान राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात सर्व आरोग्य संस्थान मार्फत दिनांक15 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अमिता मित्तल यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल कुमार नेहेते यांच्या सनियंत्रणामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 आरोग्य उपकेंद्र स्तरावरून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये डिसेंबर महिन्यात गोवर प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस तर 15 ते 25 जानेवारी या कालावधीत दिल्या जाणार असून १० दिवसाच्या दरम्यान दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यां संदर्भात नियोजन आखण्यासाठी शहर जिल्ह्यातील 9 ते 12 आणि 16 ते 24 वयोगटातील मुला मुलींची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार ग्रामीण भागातील पहिला डोस 2778 व दुसरा डोस 2684 लाभार्थींना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे जिल्ह्यात 518 लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरातील आपल्या परिसरातील नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. गोवरच्या प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना गोवरची लस टोचून घ्यावी. जिल्ह्यातील लसीकरण हे शंभर टक्के पूर्ण करणे कामी सर्वांनी आरोग्य विभागास करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती असीमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात, डॉ युवराज देवरे यांनी केले आहे.
Special Campaign of Measles Vaccination Disease in Nashik City District