पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाज कल्याण विभागाने गतिमान प्रशासना बरोबरच नवनवीन उपक्रम राबवित विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न निकाली काढले आहेत. समाज कल्याण आयुक्तालयाने एक प्रकारे कर्मचाऱ्यांना सेवाविषयक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, प्रलंबित प्रश्न निकाली निघाल्याने कर्मचाऱ्यांकडून देखील धन्यवाद व्यक्त केले जात आहेत. राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागात अनेक नव-नवीन उपक्रम राबविण्याबरोबरच कामकाजात अधिक गतिमानता निर्माण केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात गतीमानतेने निर्णय झाल्याने संबंधित कर्मचारी यांनी आयुक्त यांना भेटून धन्यवाद व्यक्त केले आहेत.
“समाज कल्याण निरीक्षक या संवर्गातून गृहपाल या संवर्गात पदोन्नती झालेल्या श्रीमती मुलांनी यांनी 2019 पासून पात्र असून देखील प्रमोशन मिळत नव्हते मात्र आयुक्त यांच्या सकारात्मक विचारामुळे आमचा प्रमोशनचा प्रश्न निकाली निघाला असून सोयीच्या ठिकाणी देखील नियुक्ती केली आहे हे विशेष म्हणावे लागेल त्याबद्दल मी आयुक्तालयाची आभारी आहे असे नमूद केले आहे. तर श्री प्रशांत हेळकर यांची समाज कल्याण निरीक्षक संवर्गातून गृहपाल या संवर्गात पदोन्नती झाली असून त्यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेताना जलद गतीने त्रुटींची पूर्तता करून पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढल्यामुळे आयुक्त यांचे आभार व्यक्त केले आहे.
श्री मुकिंदा मोरे प्रमुख लिपिक यांनी देखील त्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिल्याने समाधानी असल्याचे सांगून आयुक्त यांच्या संकल्पनेतून अभिलेखे व सहा गट्टे पद्धती प्रमाणे कार्यालयीन कामकाज करण्यात आल्याने त्याचा कामकाजासाठी फायदा होत असल्याचे नमूद केले आहे. तर श्री प्रदीप भालके यांनी आपल्या वडिलांच्या कोरोना मुळे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने नियुक्ती दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आहे.
*”श्रीमती पल्लवी मुंढे यांनी देखील त्यांच्या पतीच्या करोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत त्यांच्या जागी अनुकंपा वर जलद गतीने नियुक्ती दिल्याने त्यांनीही आयुक्तालयाचे आभार व्यक्त केले आहे”* .
वरील कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया ह्या आयुक्तालयाच्या गतीमान कारभाराचे/ कामकाजाचे प्रतिबिंब असून आयुक्त समाज कल्याण यांनी विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नदेखील प्राधान्य देत अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. व त्यातून कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने लाभ मंजूर केले आहेत.सहा. शिक्षक संवर्गातील कर्मचा-यांना नियमित वेतनश्रेणी , कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजना, निलंबित कर्मचा-यांना शासकीय सेवेत पुर्नस्थापित करणे, कर्मचा-यांना अर्हताकारी/सेवाप्रवेशोत्तर परीक्षेपासून सूट मंजूर केली, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर तसेच कर्मचा-यांना वैदयकीय प्रतिपूर्तीचा लाभ दिला, जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांना प्रतिनियुक्तीस मान्यता प्रदान केली, स्वीय सहाय्यक व गृहपाल या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, देण्यात आली, गृहपाल प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण बार्टी मार्फत देण्यात आले ,कर्मचाऱ्यांचे प्रलंबित रजा प्रकरणे मंजूर करणे,कर्मचार्यांचे रजा रोखीकरण, कर्मचारी अधिकाऱ्यांची सेवा पुस्तके अद्यावत करणे. यासारखे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आली आहेत. तसेच विभागातील सर्व संवर्गातील कर्मचारी यांच्या विभागीय परीक्षा संदर्भात देखील युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत असून लवकरच परीक्षा पार घेण्यात येणार आहेत.
समाज कल्याण विभागाने श्री धनंजय मुंडे मंत्री समाज कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्याची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. व त्यातूनच विभागाच्या कामकाजाची गतिमानता वाढलेली असून सर्व स्तरातून विभागाच्या कामकाजाचे कौतुक करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे स्वतः आयुक्त यांच्यासह आयुक्त यातील बहुतांश अधिकारी कर्मचारी यांना कोरोना ची लागण झालेली होती, असे असतानाही कामाचा धडाका लावत प्रश्न निकाली काढले आहेत. त्यामुळे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्यासह आयुक्तालयातील अधिकारी यांचे विभागातील कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येऊन धन्यवाद व्यक्त केले जात आहे