India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सोशल मिडियावरचा तो मेसेज खराय का? धुळे पोस्ट ऑफिसने केला हा मोठा खुलासा

India Darpan by India Darpan
December 24, 2022
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियावर संदीप जाधव, नावाच्या मुलाचे इंडियन आर्मीचे नियुक्ती पत्र आले आहे. परंतू त्याच्यावर चुकीचा पत्ता असल्यामुळे ते धुळे पोस्ट ऑफीसमध्ये पडले असल्याचा संदेश खोटा असल्याची माहिती धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर संदीप अशोक जाधव, नावाच्या मुलाचे इंडियन आर्मीचे नियुक्ती पत्र आले आहे. परंतू त्यावर चुकीचा पत्ता असल्यामुळे ते धुळे पोस्ट ऑफीसमध्ये पडले आहे. तो मुलगा भेटल्यावर नितीन राऊत (पोस्टमन) 8149774200/ 7276418893 वर संपर्क करा. हा संदेश त्या मुलापर्यंत पोहचला पाहिजे म्हणून कृपया हा संदेश जास्तीत जास्त शेयर करा. अशा प्रकारचा संदेश सोशल मीडीयावर मोठया प्रमाणावर प्रसारीत होत आहे.

हा संदेश फेक / बनावट असून अशा प्रकारचे कोणतेही टपाल धुळे डाक विभागात आलेले नाही. तसेच उल्लेख केलेला भ्रमणध्वनी क्रमांक बंद असून नितीन राऊत नावाचा कोणताही व्यक्ती पोस्टमन म्हणून धुळे विभागात कार्यरत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट संदेशाकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी केले आहे.

Social Media Post Message Dhule Post Office Clarification
Social Viral Fake


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा योगसाधनेचाच एक भाग

Next Post

शेतकऱ्यांनो, या स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा थेट ५० हजार रुपयांचा पुरस्कार

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

शेतकऱ्यांनो, या स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा थेट ५० हजार रुपयांचा पुरस्कार

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group