India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्मार्टफोनवर तुम्ही ‘हे’ व्हिडिओ बघतात? आधी हे वाचा

India Darpan by India Darpan
September 23, 2022
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात सरकारने पॉर्न साइट्सवर बंदी घातली असून पुन्हा त्या विरोधात उमटणार्‍या सूरांमुंळे हलकेच चोरपावलांनी ”चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म” प्रमाणे सर्व अॅडल्ट्स साइटवर बंदी असतानाही त्या गुपचूप पाहील्या जातात.
परंतु त्या साईटस तुम्हाला खूप अडचणीत आणू शकतात.

आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.

पॉर्नोग्राफी हा युरोप-अमेरिकेचा प्रश्न आहे, भारताचा नाही असं एखाद्याला वाटू शकेल. तर आता ही आकडेवारी वाचाल्यास गूगल ट्रेंड्स दाखवतो, की सन २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या काळात भारतामध्ये पॉर्न या शब्दावर जाणं दुप्पट झालं आहे आणि पॉर्न शोधणार्‍या जगातील पहिल्या दहा शहरांमधील सात शहरं भारतीय आहेत.

एका सर्वे २०११नुसार मोबाईल वापरणार्‍या दर पाच भारतीयांपैकी एकाला आपल्या फोनवर अ‍ॅडल्ट कंटेंट (म्हणजेच पॉर्न) हवं असतं.आजकाल असा एकही व्यक्ती दिसणार नाही ज्याकडे स्मार्टफोन नसेल. संपूर्ण जग आज मोठ्या प्रमाणा स्मार्टफोनचा वापर करीत आहे. पूर्वी फोनचा वापर केवळ संवादासाठी होत असला तरी आता हाच स्मार्टफोन इंटरटेनमेंटचे मोठे माध्यम बनला आहे. प्रत्येक जण यात आपले डिजिटल काम सहज करू शकता. व्हिडिओ पाहण्यासह अनेक गोष्टींसाठी जण मोठ्या संख्येने स्मार्टफोनचा वापर करताना दिसून येत आहे. अनेक जण अडल्ट कंटेंट पाहण्यासाठी याचा वापर करतात.

भारतात या प्रकारच्या कंटेंटवर पूर्णपणे बंदी आहे, परंतु तरीही अनेक लोक गुपचूप असे कंटेंट बघत असतात. दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलने केलेल्या सर्वेक्षणानुसार दर दिवशी ४७ टक्के विद्यार्थी पॉर्नबद्दल बोलतात. नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या अहवालानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये पॉर्नचा क्रमांक पहिला आहे. पहिली गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे, की पॉर्न आंतरराष्ट्रीय आहे. जगातील कुठलीही पॉर्न साइट भारतातील कुठल्याही शहरात, तालुक्यात, खेड्यात बघता येते. पॉर्न म्हणजे स्त्रीपुरुष संबंधांचं विकृतीकरण. फक्त ५ टक्के पॉर्न हे सरळ स्त्रीपुरुष संबंधाचं असतं. बाकीचं पॉर्न बलात्कार, संभोग आदी असं असतं. आता विकृतीचे अनेक प्रकार पॉर्नमध्ये दाखवले जाऊ लागले आहेत.

सध्या पॉर्नोग्राफी, पूर्वीच्या सर्व प्रकारच्या म्हणजे छापील पुस्तकं, चित्रं, पत्ते किंवा त्यापूर्वीची शिल्पे या प्रकारांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पूर्वीच्या पॉर्नोग्राफीपेक्षा आजची इंटरनेट पॉर्नोग्राफी ही लाखो पटींनी अधिक आकर्षक, अधिक मादक, अधिक सहजसाध्य, अधिक व्यसनी बनवणारी आणि म्हणून अधिक धोकादायक आहे. तिची तुलना पूर्वीच्या पॉर्नोग्राफीशी करणं हे अत्यंत चूकीचे आहे.

इंटरनेट पॉर्नोग्राफी फुकट आहे. ती घरामध्ये एका खोलीचे दार लावून पाहिली जाते किंवा लॅपटॉपवर पाहिली जाते, आता तर मोबाईलवरसुद्धा म्हणजेच पूर्णपणे खासगी आहे. एका क्लिकने हजारो-लाखो व्हिडिओज पाहता येतात, म्हणजेच ती अगदी सहज उपलब्ध आहे. दिवसाचे चोवीसही तास ते उपलब्ध असतात. शिवाय हे व्यसन कोणालाही न कळता वर्षानुवर्षे चालू राहू शकल असत.

एआय बॉट्स अशा कंटेंटकडे लक्ष ठेवून आहे. तुमच्‍या फोनवर अॅडल्ट कंटेंट पाहिल्‍यास तुम्‍हाला अडचणीत आणू शकते. असे बरेच जण आहेत जे असे कंटेंट पाहण्यासाठी पैसे मोजण्यासही तयार असतात. पण हा सर्वात मोठा धोका आहे. कारण याच्या मदतीने तुम्हाला संबंधित कंटेंट देणारी व्यक्ती तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर सहजपणे टाकू शकते त्याव्दारे तुमची सर्व माहिती चोरीलाही जावू शकते. बँक खाते रिकामे केले जाऊ शकते.

आपण नेटवर काय ब्राउझ करत आहोत याची संपूर्ण माहिती गुगलला असते. तुम्ही अडल्ट कंटेंट बघत असल्यास तुमच्या ब्राउझिंग पॅटर्नवर आधारित तुम्हाला डिझाईन केलेल्या जाहिराती दाखवल्या जातात. तुमच्या सोशल मीडियावरही बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि त्या आधारे तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात.

काही जण अनेक वेळा पॉर्न वेबसाइटवरून अशा प्रकारची फाइल डाउनलोड करतात आणि त्या फाइलसोबत जाणूनबुजून किंवा नकळत मालवेअर डाउनलोड केले जातात. याद्वारे तुमचे वैयक्तिक फोटो चोरले जातात आणि तुम्हाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. तुमच्या फोनमध्ये अडल्ट कंटेंट दिसला, तर इंटेलिजेंस एजन्सीही तुमच्यावर लक्ष ठेवून असते. आपल्या सोशल मीडिया खात्यावरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असते. जर तुम्ही पॉर्न साइटवर गेलात आणि तिथून फाइल डाउनलोड केली तर तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर टाकला जाऊ शकतो. हा मालवेअर तुमची हेरगिरी करू लागतो. तसेच तुमच्या खासगी फोटोंबद्दल तुम्हाला ब्लॅकमेलही केले जावू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी.

Smartphone Video Watching Technology Rules
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD


Previous Post

मराठवाडा मुक्ती संग्रामः अशी सुरू झाली ऑपरेशन पोलोची सुरुवात

Next Post

जबरदस्त सेल सुरू: OnePlus 10 Pro, 10R आणि Nord 2T वर २० हजार रुपयांपर्यंत सूट

Next Post
प्रातिनिधीक फोटो

जबरदस्त सेल सुरू: OnePlus 10 Pro, 10R आणि Nord 2T वर २० हजार रुपयांपर्यंत सूट

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group