अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
विविध प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी भरपावसात दिंडोरी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतर्गत अंगणवाडी सेविकावर सोपविण्यात आलेल्या कामात बदल करावा व मार्च २०२० पासुन अमृत आहार कामाचे थकीत मानधन त्वरीत अदा करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिला.