सिन्नर – सिन्नर शहरातील सिन्नर-शिर्डी रोड लगत खंडोबा नाला येथील मळ्यात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले. या बिबट्याच्या वावरामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अष्टविनायक नगर तसेच खंडोबा नाला येथील मळ्या मधील नागरिकांनी केली आहे. येथील कुंदेवाडी येथील नदी जवळ असल्याने आता बिबट्यांचे वस्त्यांमध्ये सर्रास दर्शन होत आहे. सिन्नर-शिर्डी लगत असलेल्या खंडोबा नाला येथील दिलीप वाघ यांची खंडोबा नाला येथील वस्ती असून शुक्रवारी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान त्यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने हल्ला केल्याने पायाला दुखापत झालेली दिसून आली आहे. शेजारील अनेक पिके असल्याने बिबट्या तेथील आई भवानी मातेच्या मंदिराकडे बिबट्याने धूम ठोकली तरी लवकरात लवकर वन विभागाने येथील वस्त्यांवर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गीते सुरेश तसेच खंडोबा नाल्या येथील नागरिकांनी केली आहे.