नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोल नाक्यावर केबिन कोसळल्याची घटना घडली. या केबिनमध्ये असलेल्या महिला कर्मचारी सुवर्णा जाधव व धनाजी बोडके हे जखमी झाले आहे. या दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवजड वाहनाच्या हादऱ्याने ही केबिन कोसळल्याचे बोलले जात आहे. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सिन्नरकडून- नाशिकरोडकडे येत असलेल्या अवजड वाहन केबिन क्रमांक १३ च्या गेटवरुन जातांना ही घटना घडली. या घटनेमुळे काही काळ या टोलनाक्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.